G-20 Summit in Goa 2023: G-20 सदस्य राष्ट्रांनी आरोग्य क्षेत्रात संशोधन, औषध निर्मिती आणि सामूहिक सहकार्य वाढविणे गरजेचे असून कोरोनाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्यास मत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी व्यक्त केले.
गोव्यात सुरू असलेल्या दुसऱ्या जी-20 आरोग्य कार्यगट बैठकीच्या समारोप सत्रात केंद्रीय मंत्री डॉ. मांडवीय बोलत होते.
जी-20 आरोग्य कार्य गट म्हणून आम्ही भविष्यातील जागतिक आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आणि व्यवस्थांसाठी संयुक्तपणे सकारात्मक प्रभाव निर्माण करण्याच्या दिशेने योग्य दिशेने वाटचाल करत आहोत, असे डॉ. मांडवीय म्हणाले.
भारताने प्रस्तावित केलेल्या आरोग्यविषयक प्राधान्यक्रमांशी इतर सदस्य देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी संमती दर्शविल्याचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.
कोरोना महामारीचा जगभरातील आरोग्य व्यवस्थांवर झालेला परिणाम अधोरेखित करत डॉ. मांडवीय म्हणाले, आता भीती आणि दुर्लक्ष अशा दोन्हींचे चक्र भेदण्याची आपली सामूहिक जबाबदारी आहे.
याआधी महामारीचा सामना करताना झालेल्या त्रुटी आताच्या महामारीविरुद्धच्या लढ्याला अडथळा ठरणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी. याआधी इटली आणि इंडोनेशियाच्या जी-२० अध्यक्षपदाच्या काळातील कामांची गती कायम ठेवण्याचा प्रयत्न आहे.
जागतिक समन्वय यंत्रणेची गरज:-
वैद्यकीय काउंटरमेझर्स (एमसीएम) अजेंड्यावर एकत्रित प्रयत्न व्हायला हवेत. आरोग्य सेवा वितरणामध्ये तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी जगभरातील डिजिटल तफावत कमी करण्यासाठी आणि डिजिटल सार्वजनिक वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल आरोग्य आणि नवोन्मेषविषयक अजेंडा भारताने मांडला आहे, यासाठी जागतिक समन्वयाची गरज आहे, असेही डॉ. मांडवीय म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.