Crime  Dainik Gomantak
गोवा

Crime News : जमीन हडपप्रकरणी ‘त्या’ तिघांना पुन्हा अटक; ‘एसआयटी’ची कारवाई

Crime News : आज रिमांडसाठी न्यायालयात हजर करणार

गोमन्तक डिजिटल टीम

Crime News : पणजी, राज्यातील जमीन हडप प्रकरणातील मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहेल ऊर्फ मायकल फर्नांडिस (४७ वर्षे) याच्यासह रॉयसन डिसोझा आणि स्टिव्हन डिसोझा या तिघांना तीन वेगवेगळ्या गुन्‍ह्यांमध्ये विशेष तपास पथकाने (एसआयटी) अटक केली.

त्यांना उद्या (शुक्रवारी) न्यायालयात हजर करून तपासासाठी पोलिस कोठडी घेण्यात येणार आहे.

या संशयितांविरुद्ध जमीन हडप प्रकरणाच्या ‘एसआयटी’कडे अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या, अशी माहिती या पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिली. म्हापसा पोलिस स्थानकात नोंद असलेल्या जमीन हडप प्रकरणात संशयित मोहम्मद सुहेल याला अटक करण्यात आली आहे.

संशयित रॉयसन डिसोझा आणि स्टिव्हन डिसोझा यांना क्राईम ब्रँच पोलिस स्थानकात नोंद असलेल्या प्रकरणात अटक झाली आहे. मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहेल याच्याविरुद्ध आतापर्यंत सहापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. या तिघांविरुद्ध फसवणूक, कटकारस्थान या आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जमीनमालकांना मिळणार ताबा

राज्यातील जमीन हडप प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. एसआयटीने याप्रकरणी केलेल्या तपासकामाचे निरीक्षण एकसदस्यीय आयोगाचे निवृत्त न्यायमूर्ती जाधव यांनी करून त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे.

त्यानुसार या जमिनी तक्रार केलेल्या मूळ मालकांना परत करण्यासाठीची प्रक्रिया सुरू होईल. त्यासाठी जमीनमालकाला त्या जमिनीचा अधिकृत दस्तावेज सरकार दरबारी दावा करताना सादर करावा लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT