Interview Of Goan Urdu Poet Amey Kamat Dainik Gomantak
गोवा

'भाषेला कोणत्याही धर्माची गरज नाही': उर्दू कवी अमेय कामत

दैनिक गोमन्तक

कोणतीही भाषा ही समाजातील लोकांना जोडण्याचं काम करते. जाती-धर्मापलीकडे असलेली भाषा ही आपल्या अभिव्यक्ति स्वातंत्र्याचं माध्यमंच आहे. आपला भारत देश जसा कला आणि संस्कृतीनं नटलेला आहे तसाच इथल्या भाषेतील वैविध्यामुळेही जगभरात ओळखला जातो. अशाच एका भाषाप्रेमी व्यक्तीची आपण ओळख करून घेणार आहोत.

मूळ Chartered Financial Analyst आणि सहाय्यक प्राध्यापक असलेले अमेय कामत हे गोव्यातील उर्दू भाषेतील एकमेव कवी आहेत. गोमंतक टीव्हीचे सल्लागार संपादक शैलेंद्र मेहता यांनी ‘जायना अशें कांय ना!’ या विशेष कार्यक्रमामध्ये त्यांची मुलाखत घेतली असून या मुलाखतीमध्ये कामत यांनी आपलं उर्दू भाषा शिकण्याचा आणि उर्दू भाषेचा गोव्यातून एकमेव कवी होण्यापर्यंतचा प्रवास सांगितला आहे.

उर्दू शिकण्यामागची प्रेरणा..

अमेय कामत आपला प्रवास उलगडताना म्हणाले की, मुळात माझ्या घरीच साहित्याचं वातावरण होतं. माझे बाबा अशोक कामत हे कोकणी साहित्यकार होते. त्यामुळे साहित्याची आवड माझ्यामध्ये आधीपासूनच होती. मी आधी कोंकणीमध्येच कविता करायचो. हळूहळू मी हिंदी भाषेमध्ये कविता करू लागलो. त्यावेळी मला एक गोष्ट जाणवली की, कविता करत असताना भावना व्यक्त करण्यासाठी कुठेतरी शब्दांची मर्यादा येते आणि त्याचमुळे उर्दू शिकण्याची जिद्द माझ्या मनामध्ये निर्माण झाली. यासाठी सुरुवातीला मी उर्दूतील पुस्तकं वाचायला सुरुवात केली. ही भाषा मी आपलीशी करून घेत त्यातले शब्द, त्यांचे अर्थ समजून घ्यायला सुरुवात केली. आणि हळूहळू मी उर्दूमध्ये व्यक्त होऊ लागलो. आता जवळपास 2-3 वर्षांच्या अभ्यासानंतर मी उर्दू भाषेमध्ये कविता, शायरी, गझल लिहिण्यास सुरुवात केली. आणि माझं पहिलं उर्दू भाषेतील ‘शु’आ’-ए-मेहर’ हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे.

भाषांमध्ये निर्माण झालेली दरी..

आपल्या समाजामध्ये धर्म, जाती आणि भाषा यावरून वर्षानुवर्ष एक दरी निर्माण झालेली आहे. भाषेला धर्म जोडला जाऊन त्यामधून चुकीच्या गोष्टी निर्माण केल्या जात आहेत. ज्यावेळी मी उर्दूमध्ये पुस्तक प्रकाशित करण्याचं ठरवलं, त्यावेळेला मलासुद्धा असं बोलण्यात आलं की, ‘उर्दू शिकतोयस तर मग पाकिस्तानात जा..’ यावरून आपल्याला समाजातील लोकांची मानसिकता आपल्याला कळू शकते. आपण जात-धर्म या तराजूमध्ये भाषेला तोलणं खरंतर चुकीचंच. कुठलीही भाषा ही लोकांना जोडण्याचं काम करते. कुठल्याही भाषेला कुठल्याही धर्माची गरज नसते. उर्दू भाषा ही फक्त मुस्लीम लोकांची भाषा आहे असा एक समज अनेक वर्षांपासून आपल्या देशात मानला जातो. पण खरंतर गेल्या 400 वर्षांहून अधिक काळ हिंदू माणसंही उर्दू भाषेला जपत आली असल्याचा इतिहास आहे. आपल्या भारतीय भाषांपैकीच उर्दू ही एक भाषा आहे आणि ही अमुक एका धर्माची भाषा असा विचार न करता त्यापलीकडे जाऊन आपण विचार करणं गरजेचं आहे. मी स्वतःला भाषेपलीकडचं समजतो, त्यामुळे मी अशा लोकांकडे दुर्लक्ष करून, माझा हा प्रवास पुढे सुरू ठेवला आहे, असं मत अमेय यांनी व्यक्तं केलं.

यानंतर कामत यांनी त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘शु’आ’-ए-मेहर’ या पुस्तकातील कवितेच्या काही ओळी सादर केल्या..

तारीफ नुमाइश के..

तारीफ़ नुमाइश के खूबसूरत जुतों की, होती हमसे बयाँ ही नहीं

खाल उधड गयी किस बेजुबाँ की, किसी को इसका गुमाँ ही नहीं

झूमती लौ के परवाने हैं बहुत, तवज्जोह मिली जलती बातीको भी,

पर कोई नहीं सोचे तपते तेल का, जिसके जलने का निशाँ ही नहीं

‘जायना अशें कांय ना!’ या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आपल्या समाजामध्ये, आपल्या गोव्यात जी मंडळी दैनंदिन आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत, जे काहीतरी वेगळी गोष्ट जोपासून त्यात पुढे गेले आहेत, अशा लोकांना एक व्यासपीठ मिळवून देणं आणि त्यांची ओळख आपल्या समाजाला करून देणं हा आहे. कामत यांचं क्षेत्र जरी वेगळं असलं तरी विविध भाषांवर असलेलं त्यांचं प्रेम आणि भाषांवरील त्यांची पकड ही त्यांची त्यांच्या या आवडीतून आणि त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे दिसून येते. आत्ताच्या पिढीतील ज्यांना साहित्यामध्ये काहीतरी कामगिरी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी अमेय कामत हे एक उत्तम उदाहरणच म्हणावं लागेल. त्यांच्या कार्याला गोमंतकचा सलाम...!

शब्दांकन : काव्या पोवार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT