Investment Fraud Dainik Gomantak
गोवा

Investment Fraud: जमीन खरेदी, पेन्शन योजना अन् क्रिप्टोकरन्सीच्या नावाखाली गुंतवणूक... 18.35 कोटींच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी कोर्टानं फेटाळला चौघांचा जामीन

Goa investment scam case: आर्थिक गुन्हे शाखेने ३ जून २०२५ रोजी वेनन डायस यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला होता.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: जमीन खरेदी, पेन्शन योजना आणि क्रिप्टोकरन्सीच्या नावाखाली गुंतवणूकदारांची सुमारे १८ कोटी ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सुभाष धुरी, दिगंबर भट, सारिका पिळर्णकर आणि सोमा गावकर या एजंटांचे जामीन अर्ज मेरशी येथील विशेष न्यायालयाने फेटाळून लावले. आर्थिक गुन्हे शाखेने ३ जून २०२५ रोजी वेनन डायस यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला होता.

मुख्य संशयित शिवाजी वाळके, घनश्याम शर्मा आणि शकील खान यांनी इतर सहकाऱ्यांसह ''बायो इस्टेट सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड'' आणि ‘सिनेमा ऑन वेब’ या कंपन्यांच्या माध्यमातून कोणतीही अधिकृत परवानगी नसताना बेकायदेशीर गुंतवणूक योजना सुरू केल्या होत्या. तोरसे (पेडणे) येथील जमीन खरेदी योजना, पेन्शन योजना, बायोक्कॉईन क्रिप्टोकरन्सी आणि काऊ कॉईन या चार प्रमुख योजनांद्वारे गुंतवणूकदारांना आकर्षित केले गेले होते.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने नमूद केले की, चौघांनी संशयित एजंट म्हणून काम करताना गुंतवणूकदारांना अवाजवी परताव्याचे आमिष दाखवले होते. सुरुवातीला काही काळ परतावा देऊन नंतर परतावा देणे बंद केले व वेगवेगळी कारणे पुढे केली. संशयितांनी फसव्या योजनांद्वारे तक्रारदार आणि इतर गुंतवणूकदारांना मोठी रक्कम गुंतवण्यास प्रवृत्त केले होते.

सारिका पिळर्णकर हिने एकट्याने गोव्यातून गुंतवणूकदारांकडून सुमारे १५ कोटी रुपये गोळा केल्याची माहिती सरकारी पक्षाने न्यायालयात दिली. आयपीसी कलम ४०६ आणि कलम ४२० ही कलमे एकाच वेळी लागू होऊ शकत नाहीत, हा बचाव पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावला. प्रथमदर्शनी रकमेचा ताबा आणि फसवणूक सिद्ध होत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT