Chairman Ramesh Tawadkar Dainik Gomantak
गोवा

MLA Disqualification Petition: ये तो होना ही था! चोडणकरांची आमदार अपात्रता याचिका सभापती तवडकरांनी फेटाळली

MLA Disqualification Petition:चोडणकरांची याचिका सभापती तवडकरांनी फेटाळून लावली यामुळे आठ आमदारांना दिलासा मिळाला आहे.

Pramod Yadav

MLA Disqualification Petition

पणजी: काँग्रेसमधून भाजपमध्ये पक्षांतर केलेल्या आठ आमदारांच्या विरोधात दाखल अपात्रता याचिका अखेर सभापती रमेश तवडकरांनी दोन वर्षानंतर फेटाळली. सभापती रमेश तवडकरांनी आज (०१ नोव्हेंबर) याबाबत निर्णय दिला. काँग्रेसने मात्र सभापतींच्या या निर्णयावर हे अपेक्षितच होते, असे मत नोंदवले आहे.

दोनवर्षापूर्वी काँग्रेसचे आठ आमदार पक्षांतर करुन भाजपमध्ये सामिल झाले होते. यावेळी विरोधी पक्षनेत्याची धुरा सांभाळणारे मायकल लोबो यांच्यासह इतर आमदारांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला होता. याविरोधात काँग्रेसच्या गिरीष चोडणकरांनी फुटीर आठ आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल केली होती.

चोडणकरांची याचिका आज सभापती तवडकरांनी फेटाळून लावली यामुळे आठ आमदारांना दिलासा मिळाला आहे. ऐन दिवाळीत आलेल्या या निर्णयामुळे आमदारांची दिवाळी गोड झाली आहे.

“आम्हाला निकाल अपेक्षितच होता. हा निकाल म्हणजे फक्त झेरॉक्स कॉपी आहे. अपत्रता याचिकेवर दोन वर्षानंतर निकाल लागला यातच आमचे यश आहे. कायदेशीर सल्ला घेतल्यावर पुढची भूमिका जाहीर करणार,” असे याचिकाकर्ते गिरीश चोडणकर म्हणाले.

कोण आहेत आठ फुटीर आमदार

मायकल लोबो (कळंगुट)

दिगंबर कामत (मडगाव)

आलेक्स सिक्वेरा (नुवे)

रुडॉल्फ फर्नांडिस (सांताक्रुझ)

दिलायला लोबो (शिवोली)

केदार नाईक (साळगाव)

राजेश फळदेसाई (कुंभारजुवे)

संकल्प आमोणकर (मुरगाव)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Marigold Flowers: झेंडू फुलांच्या मागणीत वाढ, लागवडीवर कृषी खात्याचा जोर; 3 वर्षांत 23.77 कोटी फुलांची आयात

Operation Flushout: ऑपरेशन फ्लशआऊट! गोव्यातील हरमल येथून रशियन नागरिकाला अटक

Valpoi: 'बाप्पाला बसवणार कुठे?' वेळूस येथील वृद्धेला मदतीची आस; घर कोसळण्याच्या स्थितीत, मुलाचीही तब्येत बिघडलेली

Goa State Film Festival: वर्षा उसगावकर यांना 'जीवनगौरव पुरस्कार', राज्य चित्रपट महोत्सवाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शुभारंभ

Artificial intelligence: शिकेल तोच टिकेल! 'एआय' टूल्समध्ये पारंगत व्हा, नाहीतर नोकरी धोक्यात

SCROLL FOR NEXT