Goa Beaches Full with Tourist Sandip Desai
गोवा

किनारी भागात स्पाच्या नावे ‘देहव्यापार’

तपासात उघड : अवैध मसाज पार्लरवाल्यांना पोलिस कारवाईची धास्ती

दैनिक गोमन्तक

योगेश मिराशी

म्हापसा : किनारी भागांत शॉपिंग सेंटर, स्पा सेंटर तसेच आयुर्वेदिक मसाज पार्लरच्या नावाखाली अवैध पद्धतीने वेश्याव्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे सक्रिय आहेत. सुरुवीताला यामध्ये टोळ्यांचा समावेश होता. परंतु, आता हे गैरव्यवहार वैयक्तिक पातळीवर केले जात असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांना धडक कारवाईचे आदेश मिळाल्यानंतर, किनारी भागातील बहुतांश मसाज पार्लर हे बंद केले आहेत. संबंधितांनी सध्या या कारवाईचा धसका घेतल्याचे दिसते.

या अवैध मसाज पार्लरवर धडक कारवाईचे निर्देश दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. त्यानुसार, पोलिसांनी डिमेलोवाडा-हणजूण परिसरातील एका बेकायदा आयुर्वेदिक स्पा सेंटरवर (6 जूनला) छापा टाकला होता. सध्या हे सेंटर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर मंगळवारी पोलिसांकडून सील करण्यात आले. मागील चार वर्षे हे सेंटर बिनदिक्कतपणे सुरू होते.

या वेश्या व्यवसायावर पोलिसी कारवाई होते, पण क्रॉस मसाजच्या नावाने ‘सेक्सचा धंदा’ चालवणाऱ्यांवर जरब काही केल्या बसत नसल्याचे दिसून येते. स्पा पार्लरच्या नावाने चालणाऱ्या वेश्या व्यवसायाला आळा घालण्याचे मोठे आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे.

भाडेकरूंची माहिती देण्याबाबत घरमालक उदासीन

मसाज पार्लरसाठी जादा भाडे मिळते. या जादा मिळकतीच्या आमिषापोटी संबंधित आस्थापन मालकांकडून अनेकदा कागदपत्रांची किंवा भाडेकरूची फारशी चौकशी होत नसते. हे अवैध प्रकार रोखण्यासाठी आस्थापने किंवा बांधकामे भाड्याने देताना संबंधितांची सर्व माहिती पोलिस स्थानकात जमा करण्याची नियमांवली यापूर्वी पोलिसांकडून वेळोवेळी जाहीर केली जाते. मात्र, त्यास घरमालकांकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. अनेकदा मूळ मालकाच्या दुर्लक्षामुळेच अनेकदा पार्लरच्या नावाखाली भरवस्तीत असे गैरप्रकार चालतात, असे पोलिस तपास समोर आले आहे.

सोशल मीडियावरूनच संपर्क

काही स्पाच्या नावाने चालकांकडून सोशल मीडियावरही मसाज पार्लरची जाहिरात केली जाते. व्हायरल जाहिरातीला लाइक, कमेंट केलेल्यांशी सोशल मीडियावरूनच संपर्क साधला जातो. ग्राहकांची गरज ओळखून विविध ऑफर्स दिल्या जातात. दररोज वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून फोन केला जातो. गजबजलेल्या ठिकाणी पार्लर, फिटनेस, आयुर्वेदिक सेंटरचा फलक लावून दिखावा केला जातो. मात्र, प्रत्यक्षात तिथे गैरप्रकार चालतात.

आव्हाने कोणती?

अशा प्रकरणात, पोलिसांना तक्रार आल्याशिवाय थेट गुन्हे दाखल करता येत नाहीत. पोलिस संबंधित ठिकाणी जाऊन आस्थापन चालकांकडून कागदपत्रांची पडताळणी करु शकतात. ते अधिकार पोलिसांकडे आहेत. मात्र, कायद्यात थेट गुन्हा नोंदविण्याची तरतूद नाही. त्यामुळे पोलिस याबाबत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना अहवाल पाठवून देतात. त्यानंतर दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पुढील कारवाई होते.

बहुतांश लोकांकडे नसते प्रमाणपत्र

चेहऱ्याला हलका मसाज देणारी ब्यूटी पार्लर किंवा स्पा केंद्रे राज्यात अनेक आहेत. परंतु, काहीजण स्पा म्हणून नोंदणी करुन तिथे गैर मार्गाने मसाज केंद्रे चालविण्याचा प्रकार सर्रास घडतात. मुळात मसाज ही आयुर्वेदिक उपचारपद्धती असते. मात्र, अशा पार्लरमध्ये काम करणाऱ्या महिला, पुरुषांजवळ कोणत्याही अधिकृत शिक्षणाचे प्रमाणपत्र नसते. जेव्हा पोलिस छापे टाकतात, तेव्हा ताब्यात घेतलेल्यांकडे पोलिस मसाज प्रशिक्षणाचा अधिकृत दाखला मागतात. परंतु, त्याच्याकडे तो नसतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

International Purple Fest 2025: गोव्यातील समुद्रकिनारे आणि सार्वजनिक इमारती दिव्यांग-सुलभ बनवणार; मुख्यमंत्री सावंत यांची ग्वाही

IND vs WI 2nd Test: शुभमन गिल दिल्लीत रचणार 'महाकीर्तिमान'? डॉन ब्रॅडमन नंतर अशी कामगिरी करणारा ठरणार पहिला कर्णधार

घरात भांडण करुन पळाले, कच्छच्या जंगलात गाववाल्यांनी पकडले, अल्पवयीन पाकिस्तानी जोडप्याने प्रेमासाठी पार केली देशाची सीमा

Fishing Boat Accident: काणकोणातील राजबाग किनाऱ्यावर पुन्हा बोट उलटली, स्थानिक मदतीसाठी धावले!

Viral Video: बिहारमधून दिसू लागला हिमालय आणि माऊंट एव्हरेस्ट; मनमोहक व्हिडिओ आला समोर Watch

SCROLL FOR NEXT