Tenant Verification Dainik Gomantak
गोवा

North Goa: उत्तर गोव्यातील भाडेकरूंची पडताळणी पूर्ण! दीड लाखांहून अधिक नोंदणी

Tenant Verification: उत्तर गोव्यात दीड लाखांहून अधिक भाडेकरूंच्या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

North Goa Tenant Verification

पणजी: उत्तर गोव्यात दीड लाखांहून अधिक भाडेकरूंच्या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली आहे.

राज्य सरकारने भाडेकरू पडताळणी करण्यासाठी कायदा करून भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घर मालकांना १० हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याची तरतूद केली आहे. त्यानंतर या पडताळणीला पोलिसांनी गती दिली आहे.

कौशल यांनी सांगितले, की उत्तर गोव्यातील सुरक्षा व्यवस्थेला बळकट करण्यासाठी भाडेकरूंची पडताळणी प्रक्रिया राबवली असून आतापर्यंत एक लाख ७० हजार भाडेकरूंच्या पडताळणीची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे.

गोव्यात वाढत्या पर्यटनामुळे आणि परराज्यातून येणाऱ्या लोकांच्या वाढत्या संख्येमुळे सुरक्षा तपासणी आणि पडताळणी करणे अत्यावश्यक बनले आहे. पोलिसांकडून भाडेकरूंची पडताळणी करण्यामागचा उद्देश म्हणजे गैरव्यवहार रोखणे, अवैध कृत्ये आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, तसेच आपत्तीसदृश परिस्थितीत माहिती मिळवणे. या तपासणीमध्ये भाडेकरूंची वैयक्तिक माहिती, त्यांचे ओळखपत्र, पूर्व इतिहास याची तपासणी केली जाते.

पोलिस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी भाडेकरू ठेवताना संबंधित व्यक्तीची पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी आणि भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात नोंदवावी. यामुळे सुरक्षा यंत्रणेचा कार्यक्षमता वाढेल आणि नागरिकांना सुरक्षित वातावरणात राहता येईल.

भाडेकरूंच्या तपासणी प्रक्रियेमुळे पोलिसांना गावातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे सोपे होणार असून स्थानिकांचे आणि पर्यटकांचे रक्षण करण्यासाठी पोलिसांना मदत मिळणार आहे, असे त्यांनी नमूद केले. दक्षिण गोव्यात ७५ हजार ८८७ भाडेकरूंची पडताळणी आत्तापर्यंत करण्यात आली आहे, अशी माहिती दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनिता सावंत यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: मोले येथे ट्रक कलंडला!

Goa BJP: तानावडेंसमोर तवडकर ठाम! समजूत काढण्यासाठी आता पुढच्या आठवड्यात बैठक

Cuchelim: 'कुचेली कोमुनिदाद'बाबतीत गोवा खंडपीठ गंभीर! कारवाईचे दिले निर्देश; 'ती' 4 घरे पाडली जाणारच

Cash For Job: 'Viral Audio Tape' मागे बदनामी करण्याचा हेतू! आमदार गावकरांनी केली चौकशीची मागणी

Rashi Bhavishya 14 November 2024: व्यवसायातून खास फायदा होईल, आपल्या दिलदार स्वभावामुळे लोकं प्रसन्न राहतील; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

SCROLL FOR NEXT