Goa Restaurants Sealed Dainik Gomantak
गोवा

Goa Restaurants Sealed: चार विनापरवाना रेस्टॉरंटना टाळे, जिल्हा प्रशासनाची कारवाई; हरमलात एका आस्थापनावर बडगा

Goa illegal restaurant sealing: कायदेशीर सोपस्कार पार न पाडताच खुलेआम व्यवसाय करणाऱ्या सासष्टीतील किनारी भागातील चार रेस्टॉरंटवर दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताना आज या रेस्टॉरंटना टाळे ठोकले.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: कायदेशीर सोपस्कार पार न पाडताच खुलेआम व्यवसाय करणाऱ्या सासष्टीतील किनारी भागातील चार रेस्टॉरंटवर दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताना आज या रेस्टॉरंटना टाळे ठोकले. यात कोलवा येथील तीन तर बाणावली येथील एका रेस्टॉरंटचा समावेश आहे. उत्तर गोव्यात हरमल येथील एका रेस्टॉरंटवर कारवाई केली.

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लेटस यांनी ही माहिती दिली. कोलवा येथील गेलेरिया, फिशलॅण्ड आणि कोलमार रिसॉर्ट तर बाणावली येथील युवर स्टोरी या रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आली. या धड़क कारवाईमुळे कायदेशीर सोपस्कार न पार पाडता व्यवसाय करणारी आस्थापने आता रडारवर आली आहेत.

या सर्व रेस्टॉरंट चालकांकडे व्यवसाय परवाना तसेच अग्निशामक दलाचा ना हरकत परवाना नव्हता. मात्र, ते बिनधास्तपणे व्यवसाय करत होते, असे चौकशीत उघड झाल्याचे क्लेटस यांनी सांगितले.

हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन क्लबला आग लागून २५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने आता बेकायदा रेस्टॉरंट व अन्य व्यावसायिक आस्थापनांवर कडक कारवाईचे सत्र सुरू केले आहे. अशा रेस्टॉरंट चालकांची प्रशासनाने सूची तयार केली असून, त्यांच्यावर आता कारवाई अटळ आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

ऑटेलियो क्लब सील

जागेची सनद किंवा अधिकृत परवाना नसताना बामणभाटी - हरमल येथे मिठागरामध्ये उभारलेला लाकडी पूल आणि छोट्या योगा डेस्कमुळे पूर्ण ऑटेलियो क्लब सील करण्यात आला. ही कारवाईवेळी मामलेदार आमोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तलाठी महेश सावंत तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

बामणभाटी येथील सर्व्हे क्र. ५२/१ मध्ये अंदाजे ७०० चौरस मीटर जागेत मिठागराच्या मध्यभागी लाकडी साहित्याद्वारे पूल व डेस्कची उभारणी केली आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा परवाना व जागेची रूपांतरण सनद नसल्याने क्लब सील करण्याचा आदेश देण्यात आला. या जागेची सरकारी दस्तावेजामध्ये सर्व्हे नंबर ५२/१ मध्ये ‘मिठागर’ म्हणून नोंद आहे. त्यामुळे हा क्लब-रेस्टॉरंट सीलबंद करण्याचे आदेश मामलेदार कार्यालयाने जारी केले.

याबाबत चौकशी केली असता, गेले १० दिवस हा क्लब बंद असून ‘फूड ॲण्ड ड्रग्स’ विभागाच्या अधिकाऱ्यांनी तेथे येऊन आवश्यक त्या सूचना व निर्देश दिले होते. तसेच अग्निशमन खात्याकडून नूतनीकरण व पाहणी होणार असल्याने क्लब बंद ठेवला होता, असे व्यवस्थापकांनी सांगितले.

जमीनमालक लक्ष्मीकांत पार्सेकर यांची प्रतिक्रिया घेतली असता, ही जमीन करारपत्राने लीजवर दिली असून त्यातील व्यवहार व अन्य गोष्टीला संबंधित व्यक्ती जबाबदार असतील. त्यात माझा काहीही सहभाग नसल्याचे सांगितले. कायद्यानुसार जे शक्य आहे, ते करण्याचे अधिकार संबंधित खात्याला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पुढील आठवड्यात या क्लबमध्ये आंतरराष्ट्रीय गायक-कलाकारांचा कार्यक्रम निश्चित केला होता. मात्र, या कारवाईमुळे सगळी गुंतवणूक पाण्यात गेल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

माझ्‍या दोन जागा लीजवर दिलेल्‍या आहेत. तेथे जर कुणी कायद्याचे उल्‍लंघन केले असल्‍यास त्‍याला तोच जबाबदार. त्‍यालाच ते भोगावे लागेल. कारवाई झालेले हॉटेल माझे नव्‍हे.

- लक्ष्‍मीकांत पार्सेकर, माजी मुख्‍यमंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asmitai Dis: पणजीसह राज्यात आज 'अस्मिताय दीस', 'जीआय टॅग'प्राप्त अर्जदारांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सत्कार

Vasco: वास्कोतील गोम्स मार्गावरील वाहतूक झाली सुरळीत, वाहनचालकांत समाधान; मासे विक्रेते स्थलांतरीत झाल्याने रस्ता झाला मोकळा

59 वर्षांपूर्वीचा तो 'जनमत कौल': जेव्हा गोमंतकीयांनी इतिहास घडवला आणि 'गोवेपण' वाचवलं!

History: चौफेर शत्रू अन् शंभूराजांची 'रणनीती'; गोव्यात स्वतःचा दारूगोळा कारखाना उभारून शत्रूला नमवलं!

विकासाचा ढोल मोठा, पण सूर बेसूर; चिंबलपासून तुयेपर्यंत जनअविश्वासाचा वणवा - संपादकीय

SCROLL FOR NEXT