Goa Drowning Incident Dainik Gomantak
गोवा

Goa Drowning Incident: उधाणलेल्या लाटा अन् जीवरक्षकांचे शौर्य! सलग तीन दिवसांत 3 होड्या उलटल्या; कोलवा आणि बाणावलीत 28 मच्छीमारांची सुखरुप सुटका

Goa Lifeguards Rescue 28 Fishermen: दर्या खवळलेला असताना दक्षिण गोव्याच्या किनारपट्टीवर गेल्या तीन दिवसांत होड्या उलटल्याच्या सलग तीन घटना समोर आल्या आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: दर्या खवळलेला असताना दक्षिण गोव्याच्या किनारपट्टीवर गेल्या तीन दिवसांत होड्या उलटल्याच्या सलग तीन घटना समोर आल्या आहेत. अशाच प्रकारच्या दोन घटना कोलवा आणि बाणावली येथे घडल्या. यावेळी २८ मच्छीमारांना किनाऱ्यावर तैनात केलेल्या जीवरक्षकांनी सुखरूप किनाऱ्यावर आणले.

पहिली घटना बाणावली समुद्र किनाऱ्याजवळ घडली. येथे एक लहान मच्छीमारी होडी अचानक समुद्रात उलटली. या होडीवर एकूण १३ मच्छीमार होते. दुर्घटना घडताच किनाऱ्यावर तैनात असलेल्या जीवरक्षकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि होडीवरील सर्व १५ जणांना सुखरूप किनाऱ्यावर आणले. दुसरी घटना कोलवा समुद्र किनाऱ्याजवळ घडली. येथे १३ जणांना घेऊन जाणाऱ्या यावेळी जीवरक्षकांनी त्यांना समुद्राबाहेर काढले.

बेतूलचे कोस्टल पोलिस निरीक्षक नवलेश देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांत किनारपट्टी भागात होडी दुर्घटना घडण्याची ही तिसरी वेळ आहे. दोन दिवसांपूर्वी अशीच एक घटना बेताळभाटी येथे घडली होती. आजच्या या दोन्ही घटनांची माहिती मिळताच कोस्टल पोलिसांच्या पथकाने घटनास्थळांना भेट दिली. याप्रकरणी पंचनामा केला आहे, असे देसाई यांनी सांगितले.

बंदी फक्त यांत्रिकी बोटींवर

सध्या गोव्यात मासेमारीस बंदी असली तरी ती फक्त यांत्रिकी बोटीने मासेमारी करण्यावर आहे. ती बंदी १ ऑगस्टपासून उठणार आहे. मात्र, पारंपरिक होड्या घेऊन मासेमारी करण्यावर कोणतीही बंदी नाही. या कालावधीत मोठ्या प्रमाणात सोलार कोळंबी किनाऱ्यावर येते आणि या कोळंबीला बरीच मागणी असते. ही कोळंबी हातची जाऊ नये, यासाठी दर्या खवळलेला असतानाही पारंपरिक मच्छीमार जीव धोक्यात घालून समुद्रात जातात आणि कधीतरी त्यांना अशा दुर्घटनांना सामोरे जावे लागते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT