South Goa MP Viriato Fernandes said in the Lok Sabha that coal transport is a threat to Goas tourism  Dainik Gomantak
गोवा

MP Viriato Fernandes: कोळसा वाहतुकीचा राज्याच्या पर्यटनाला धोका; गोव्याचे कॅप्टन लोकसभेत गरजले

गोमन्तक डिजिटल टीम

रेल्वेचे दुपदरीकरण तिनई घाट ते वास्को द गामा या रेल्वे मार्गावर केले जात आहे. त्याच प्रमाणे रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण निवासी क्षेत्र, शेत जमीन व सीआरझेड क्षेत्रातून केले जात आहे. त्यामुळे गोव्याच्या निसर्गाचा समतोल बिघडेल व त्याचा पर्यटनावर परिणाम होईल, असे खासदार कॅ.विरियातो फर्नांडिस यांनी लोकसभेत सांगितले.

गोव्यातील रेल्वेच्या दुपदरीकरणाचा मुद्दा फर्नांडिस यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, रेल्वेचे दुपदरीकरण केवळ कोळसा वाहतुकीसाठी केले जात आहे. गोव्यात कृषी, खाण व्यवसायानंतर पर्यटन हे सध्या महसूल मिळविण्याचे प्रमुख साधन आहे. कोळसा वाहतूक गोव्यासाठी हानिकारक ठरणारी आहे. सध्या गोव्यात युवकवर्ग शेतीक्षेत्राकडे आकर्षित होऊ लागले आहेत. मच्छिमार व्यवसायावर सुद्धा त्याचा परिणाम जाणवणार आहे.

टॅक्सी व्यवसाय अन्यत्र करा!

गोव्यात आता रेल्वे टॅक्सी सारख्या व्यवसायामध्ये उतरू पहात आहे, असे सांगून कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले, की टॅक्सी व मोटर सायकल पायलट व्यवसाय हा गोव्यातील युवकांच्या उत्पन्नाचे साधन आहे, रेल्वेने त्याऐवजी मथुरा, वालंकिणी, पंढरपूर किंवा देशातील इतर धार्मिक स्थळांकडे जाण्यासाठी प्रवासी रेल्वे गाड्यांची व्यवस्था करावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhutani Infra: भूतानी प्रकल्‍पावरुन सावंत सरकार अडचणीत, मालकी हक्‍क न तपासता परवाना दिल्‍याचा आरोप

मुख्यमंत्री प्रमोद सावंत नाराज, गोवा विद्यापीठाचे मानांकन घसरल्यावरुन व्यक्त केली चिंता

Goa Today's News Live: गावच्या गणपती दर्शनासाठी गेला अन् चोरट्यांनी घरात डल्ला मारला; ४५ मिनिटांत ६ लाखांचा ऐवज लंपास

Sahara Refund Cap: सहारामध्ये पैसे अडकलेल्या गुंतवणुकदारांना दिलासा, रिफंडबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

SCROLL FOR NEXT