Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: मंत्री नाईक माहित नाही पण सार्दिन लोकसभेत म्हादईचा मुद्दा मांडणार - गोवा काँग्रेस

म्हादईप्रश्नी काँग्रेस अतिशय संवेदनशील असून, हा मुद्दा आम्ही संसदेत मांडणार आहोत - मणिकम टागोर

Pramod Yadav

म्हादईचा मुद्दा मागील अनेक दिवसांपासून गोव्यात गाजत आहे. कर्नाटकच्या सुधारित डिपीआरला केंद्रील जल खात्याने मंजूरी दिल्यामुळे म्हादईचे पाणी वळविण्याची परवानगी कर्नाटकला मिळाली आहे. म्हादईचे पाणी वळविल्यास याचा गोव्यातील अनेक तालुक्यांना मोठा फटका बसणार आहे. अशात कर्नाटकचा डिपीआर मागे घ्यावा अशी मागणी राज्य सरकारसह राज्यातील विरोधी पक्ष करत आहेत.

गोवा काँग्रेसने म्हादईचा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. यावरून काँग्रेसने वारंवार सत्ताधारी भाजप आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या आज झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत देखील हा मुद्दा प्रामुख्याने मांडण्यात आला.

दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी यावेळी म्हादईवर भाष्य केले. म्हादईचा मुद्दा यावेळी आपण संसदेत मांडणार असल्याचे सार्दिन यांनी स्पष्ट केले. तसेच, गोव्याचे नवे प्रभारी मणिकम टागोर देखील संसदेत म्हादईचा मुद्दा उपस्थित केल्यास सर्व काँग्रेस नेते त्याला पाठिंबा देतील असा विश्वास व्यक्त केला.

याशिवाय विविध काँग्रेस नेते आणि खासदार यांना देखील याला समर्थन द्यायची विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हादईप्रश्नी समर्थन देणार का नाही? याबाबत माहिती नसल्याचे टागोर म्हणाले.

म्हादईप्रश्नी काँग्रेस अतिशय संवेदनशील असून, हा मुद्दा आम्ही संसदेत मांडणार आहोत. मंत्री नाईक मांडणार की नाही याबाबत तुम्ही त्यांना प्रश्न विचारा. असेही टागोर म्हणाले.

दिनेश गुंडूराव यांची हकालपट्टी केल्यानंतर मणिकम टागोर यांच्याकडे गोव्याच्या काँग्रेस प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, टागोर यांनी आज काँग्रेस पदाधिकारी, आमदार व प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार आल्टन डिकॉस्टा, आमदार कार्लोस फरेरा, खासदार फ्रान्सिस सार्दिन, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या तसेच, नव्याने पक्षात येणाऱ्या लोकांना अतिमहत्व देण्याची गरज नाही. राज्यात काँग्रेस पुन्हा उभा राहण्यासाठी पक्षाला उभारी मिळण्यासाठी अजून काही वेळ लागेल असे टागोर यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026: 'टी20 वर्ल्ड कप'साठी सर्व 20 संघ निश्चित; नेपाळ, ओमाननंतर जपानला हरवून यूएईनं तिकीट केलं पक्क; पाहा संपूर्ण यादी

रवींच्या निधनामुळे दुखवटा असताना सरकारने आयोजित केला सांस्कृतिक कार्यक्रम? सरकार असंवेदनशील असल्याचे काँग्रेसची टीका

Suicide Attack In Pakistan: पाकिस्तानी सैन्याच्या चेकपोस्टला पुन्हा बनवले निशाणा! आत्मघाती हल्ल्यात 20 सैनिक मारल्याचा दावा, धडकी भरणारा VIDEO व्हायरल

IND vs AUS Live Streaming: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामना मोफत कुठे पाहता येणार? काय आहे सामन्याची वेळ? जाणून घ्या सर्व

Virat Kohli: विश्वविक्रम रचण्यापासून 'किंग' कोहली फक्त एक पाऊल दूर, 'क्रिकेटच्या देवा'ला मागे टाकण्याची संधी

SCROLL FOR NEXT