FRANCIS SARDINHA Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: सार्दिननी विचारले केवळ 86 प्रश्‍न

Goa Politics: पाच वर्षांचा लेखाजोखा: महाराष्ट्रातील 49 खासदारांनी विचारले 315 प्रश्‍न

दैनिक गोमन्तक

Goa Politics:

उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक हे राज्यमंत्री असल्याने ते प्रश्न विचारू शकत नव्हते. दक्षिण गोव्याचे खासदार फ्रांसिस सार्दिन यांनी पाच वर्षात केवळ ८६ प्रश्न विचारले. महाराष्ट्रातील ४९ खासदारांनी सर्वांधिक म्हणजे ३१५ प्रश्न विचारले तर सर्वात कमी प्रश्न मणिपुरच्या दोन खासदारांनी (२५ प्रश्न) विचारले.

असोसिएटेड डेमोक्रेटीक रिफॉर्मस् या संस्थेने केलेल्या विश्लेषणानुसार गोव्यातील खासदारांची कामगिरी उघड झाली आहे.

गोव्यातील जनतेने निवडून दिलेले दोन खासदार संसद अधिवेशनाच्या सर्व दिवसांत संसदेत उपस्थित नव्हते. सरासरी १२९ दिवस संसदेत उपस्थित होते.

छत्तीसगडमधील ११ खासदार आणि गुजरातचे २६ खासदार सर्वाधिक दिवस म्हणजे २७३ दिवसांपैकी २१६ दिवस संसदेत उपस्थित होते. सर्वात कमी उपस्थिती ही अरुणाचल प्रदेशातील २ खासदारांची आहे. ते २७३ पैकी केवळ १२७ दिवस कामकाजात सहभागी झाले होते.

१७ व्या लोकसभेत कॉंग्रेसच्या ५४ खासदारांनी मिळून केवळ १९६ तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ५ खासदारांनी ४१० प्रश्न विचारले होते. सर्वात कमी प्रश्न अपना दलाच्या दोन खासदारांनी (केवळ ५ प्रश्न) विचारले. संसदेतील ५०५ खासदारांनी मिळून ९२ हजार २७१ प्रश्न विचारले त्यात सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या दहा खासदारांत दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचा समावेश नाही.पहिल्या १० खासदारांत शेजारील महाराष्ट्रातील ६ खासदारांचा समावेश आहे.

सार्दिन यांची कामगिरी

२७३ पैकी २५५ दिवस (९३.४ टक्के) उपस्थिती. ८६ प्रश्न विचारले. संसदेत खासदारांनी सरासरी १६५ प्रश्न विचारले याचा अर्थ सार्दिन यांनी सरासरी गाठलेली नव्हती. संसदेत खासदारांची उपस्थिती सरासरी १८९ दिवस होती ती सार्दिन यांनी ओलांडली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Valpoi News: पुलावरून घेतली उडी, स्थानिकांच्या धाडसामुळे वाचले प्राण; वाळपईत आत्महत्येचा प्रयत्न

Goa Assembly: 'भाजपशासित प्रदेशात अल्पसंख्यांकांना धोका' आलेमाव आक्रमक; 'इतरांची उदाहरणं देऊ नका' मुख्यमंत्र्यांचा पलटवार

Viral: देशाचं नाव खराब होतंय... विदेशी महिलेसोबत तरूणांकडून सेल्फीचा बहाणा, पुढे जे घडलं ते संतापजनक! पाहा VIDEO

Goa Third District: गोव्यात तिसरा जिल्हा झाल्यावर 'सरकारी कामे' वेळेत होणार का? की नोकऱ्यांत ओळखीची लोकं घुसणार..

Goa Assmbly Live: 'त्यांना' ३ वर्षे तुरुंगात डांबू!

SCROLL FOR NEXT