South Goa MP Captain Viriato Met Hon. Minister for Railways, Shri Ashwini Vaishnav  Dainik Gomantak
गोवा

Goa To Vailankanni Special Train: गोव्याहून वालंकन्नीला जाणाऱ्या यात्रेकरुंसाठी विशेष गाड्या द्या! फर्नांडिस यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

South Goa MP Captain Viriato Fernandes: रेल्वेकडून दरवर्षी तामिळनाडूतील वालंकन्नी येथील चर्च उत्सववासाठी विशेष गाड्या सोडल्या जातात. देशभरातून ख्रिस्ती बांधव इथे पोहोचतात.

Manish Jadhav

रेल्वेकडून दरवर्षी तामिळनाडूतील वालंकन्नी येथील चर्च उत्सवासाठी विशेष गाड्या सोडल्या जातात. देशभरातून ख्रिस्ती बांधव इथे पोहोचतात. मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर आता गोव्यातूनही वालंकन्नीसाठी विशेष गाड्या सोडण्यात याव्यात, अशी मागणी दक्षिण गोव्याचे कॉंग्रेसचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केली आहे. फर्नांडिस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची आज (7 ऑगस्ट) भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी वैष्णव यांना वालंकन्नीला जाणाऱ्या यात्रेकरुंसाठी गोव्यातून विशेष गाड्या सोडण्यात याव्यात अशा आशयाचे निवेदन दिले.

दरम्यान, फर्नांडिस यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेवून 27 ऑगस्ट ते 08 सप्टेंबर या कालावधीत गोव्याहून (Goa) वालंकन्नीला जाणाऱ्या यात्रेकरुंसाठी विशेष गाड्या मंजूर करण्यात याव्यात अशी मागणी केली. यावेळी, वैष्णव यांनीही कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना वालंकन्नीसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याबाबत आश्वासन दिले.

फर्नांडिस संसदेत गरजले

विरियातो यांनी लोकसभेत बोलताना आपल्या भाषणातून केंद्र सरकारचा (Central Government) चांगलाच समाचार घेतला होता. त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. गोव्याला कोल हबमध्ये रुपांतर करु नका, म्हणत विरियातो यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले होते. त्यांनी राज्यातील पर्यटनाचा नाश करणाऱ्या प्रकल्पाची सक्ती केल्याबद्दल सरकारवर सडकून टीका केली होती.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यातून भाजपच्या (BJP) उमेदवार पल्लवी धेंपो यांना पराभूत करत कॉंग्रेसच्या विरियातो फर्नांडिस यांनी शानदार विजय नोंदवला होता. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात खूप घमासान पाहायला मिळाले होते. संविधानाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे विरियातो यांना मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Ashok Saraf: 'अशें, तुका कळूंक ना?' अशोक मामांच्या तोंडी पुन्हा प्रोफेसर धोंड; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT