Konkani language Goa Dainik Gomantak
गोवा

''कोकणी जगली तरच गोमंतकीय आणि गोवा जगेल'', कॅप्टन विरियातोंचे मोठे विधान

Captain Viriato Fernandes Konkani: कोकणी जगली तरच गोमंतकीय आणि गोवा जगेल, असे सांगताना कोकणीमुळे गोव्याची अस्मिता आणि संस्कृती टिकून राहिली आहे

Akshata Chhatre

फोंडा: कोकणी जगली तरच गोमंतकीय आणि गोवा जगेल, असे सांगताना कोकणीमुळे गोव्याची अस्मिता आणि संस्कृती टिकून राहिली आहे, जी पुढील पिढीपर्यंत व्यवस्थितपणे पोचवण्याची खरी जबाबदारी आता गोमंतकीयांवर असल्याचे उद्‍गार दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी काढले.

फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिरात आज कोकणी भाषा मंडळाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योजक संदीप निगळ्ये, कोकणी भाषा मंडळाच्या अध्यक्ष रत्नमाला दिवकर, सचिव मंगलदास भट, खजिनदार पुरुषोत्तम वेर्लेकर, जॉन आगियार, फिलोमिना फ्रान्सिस्को, भिकू नाईक, जॉन आगियार, भारती जाधव, उदय म्हांब्रे उपस्थित होते.

विरियातो फर्नांडिस म्हणाले की, गोमंतकीय हे आदरातिथ्यासाठी प्रसिद्ध आहेत, आपल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य गोमंतकीय मनापासून करतात, त्यामुळेच इतर राज्यातील लोक गोव्यात जमिनी घेऊ पाहात आहेत, निवास करीत आहेत. आत्तापर्यंतच्या अनेक आंदोलनात गोमंतकीय खंबीरपणे उभा राहिला भाषिक वाद, जनमत कौलावेळी गोमंतकीयांनी आपली शक्ती दाखवली आणि गोव्याची अस्मिता टिकवून ठेवली. समृद्ध गोव्याच्या उत्कर्षासाठी ही अस्मिता टिकवून ठेवण्याची आवश्‍यकता असून सर्वांनी एकजुटीने कार्य करूया.

उद्योजक संदीप निगळ्ये तसेच इतर मान्यवरांनी कोकणी भाषा मंडळाला शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार विरियातो फर्नांडिस यांच्या हस्ते कोकणी भाषा मंडळाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

स्वागत कोकणी भाषा मंडळाचे उपाध्यक्ष रुपेश ठाणेकर यांनी केले, तर अध्यक्ष रत्नमाला दिवकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी कोकणी भाषा मंडळाच्या कार्याचा आढावा घेताना आगामी योजनांचीही माहिती दिली. यावेळी विविध पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

‘एकजुटीने गुण्यागोविंदाने राहूया!’

गोव्याबद्दल बिगर गोमंतकीयांना मोठे आकर्षण आहे. येथील आदरातिथ्य, स्वागतशीलता आणि सुरक्षितता या लोकांना भावते म्हणून ते गोव्यात रहायला येतात, पण मी तर म्हणेन की गोव्यात या, पर्यटन करा आणि परत आपल्या गावी जा, असे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी सांगून गोव्यात सर्व गोमंतकीयांनी एकजुटीने गुण्यागोविंदाने राहिले तर गोव्यात शांतता प्रस्थापित होईल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: प्रतिष्ठा आणि कीर्ती वाढेल, कामातील यशामुळे आत्मविश्वास दुणावेल; जुने व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता

मोडलेला हात आणि पाय, लंगडी घालत आला पोलिस स्थानकात; ऑस्ट्रेलियन खेळाडुंची छेड काढणाऱ्या संशयिताला अटक Watch Video

Satish Shah: सलग 55 एपिसोडमध्ये साकारल्या 55 भूमिका, सतीश शाहांचे निधन; हसऱ्या चेहऱ्याचा पडला पडदा

गोव्यात प्रथमच पार पडली वजन-माप खात्याच्या नियंत्रकांची राष्ट्रीय परिषद; CM सावंतांनी दिली ग्राहकांच्या हक्काचे जतन करण्याची हमी

हाताशी आलेली भातशेती आडवी, पणजीत घराचे नुकसान; गोव्यात मान्सूनोत्तर पावसाचे धुमशान

SCROLL FOR NEXT