Curchorem Minor girl Assault Dainik Gomantak
गोवा

Minor girl Assault: लग्नाच्या आमिषाने वर्षभर लैंगिक अत्याचार, पीडिता अल्पवयीन; रुमडामळ- दवर्लीतील नराधम गजाआड

Curchorem Minor girl Assault: कुडचडे येथील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण प्रकरण ताजे असतानाच आज दक्षिण गोव्यात आणखी एक प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव : कुडचडे येथील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण प्रकरण ताजे असतानाच आज दक्षिण गोव्यात आणखी एक प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

लग्नाचे  आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी यशवंत हरिजन  (वय २६ वर्षे)  या  नराधमाच्या मुसक्या आवळून  त्याला गजाआड केले. गेले वर्षभर  तो पीडितेवर अत्याचार करीत  होता.

घरच्या मंडळींच्या लक्षात ही बाब आल्यानंतर कुटुंबीयांनी सामाजिक कार्यकर्त्या  प्रतिमा कुतिन्हो यांच्याशी संपर्क साधून पोलिस ठाणे गाठले  आणि तक्रार नोंद केली. पोलिसांनी संशयिताला शोधून काढून त्याच्या हाती बेड्या ठोकल्या. 

संशयित यशवंत हा बसचालक असून तो रुमडामळ-दवर्लीत राहतो. तो मूळ कर्नाटकातील गोकाक येथील आहे. पीडित मुलगी मडगावात टेलरिंग वर्गासाठी जात होती. यशवंतने तिच्याशी  गोड बोलून  मैत्री केली आणि नंतर विवाहाचे आमिष दाखविले.

नंतर तिचे लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी  संशयितावर  पोक्सो कलम ४, ६,  तसेच भारतीय न्याय संहितेच्या ६४ (२) अंतर्गत गुन्हा नोंद केला अाहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "चिमुकल्यांचे हात-पाय बांधून अमानुष छळ!" डेकेअर सेंटरचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी 13 जणांना ठोकल्या बेड्या

Goa Professional League 2026: स्पोर्टिंग क्लब द गोवाचा 'विराट' विजय! डॉयल अल्विसची शानदार हॅटट्रिक अन् प्रोफेशनल लीगच्या जेतेपदावर तिसऱ्यांदा कोरलं नाव

Goa River Drowning Cases: गोव्यात बेफिकिरीमुळेच बुडण्याच्या घटनांमध्‍ये होतेय वाढ! सत्तरी तालुक्‍यातही चिंता; मद्यसेवन, सुरक्षेअभावी नद्या बनल्‍या धोकादायक

Harmal Wedding Theft : वीज पुरवठा थांबवून मारला डल्ला, लग्नसोहळ्यातील लुटीचा पडद्याआडून खेळ तपासाचे आव्हान

Bicholim Class 11 Admissions : अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ, विज्ञान शाखेसाठी चुरस; ‘ऑनलाईन’ प्रवेश प्रक्रिया सुरू

SCROLL FOR NEXT