Sanvordem Truck Owners Association protest Dainik Gomantak
गोवा

दक्षिणेत खाण व्यवसाय कधी सुरू होणार? सावर्डे ट्रकमालक संघटनेचा प्रश्‍न; त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

Sanvordem Truck Owners Association protest: राज्यात आर्थिक मंदीचे सावट असताना दक्षिण गोव्यात खाण व्यवसाय अद्याप सुरू न झाल्याने ट्रक व्यावसायिकांचा संयम सुटला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

कुडचडे: राज्यात आर्थिक मंदीचे सावट असताना दक्षिण गोव्यात खाण व्यवसाय अद्याप सुरू न झाल्याने ट्रक व्यावसायिकांचा संयम सुटला आहे. याबाबत एकत्र येत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या आश्वासनांनंतरही कामकाज सुरू न झाल्याच्या निषेधार्थ सावर्डे ट्रकमालक संघटनेच्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. दक्षिण गोव्यात खाण व्यवसाय नेमका कधी सुरू होणार? असा सवाल उपस्थित करत सरकारने आठ दिवसांत ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

संघटनेचे अध्यक्ष वल्लभ दळवी म्हणाले की, उत्तर गोव्यात काही ठिकाणी हालचाल दिसते. मात्र, दक्षिण गोव्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. तसेच प्रत्यक्षात काम सुरू होत नसल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.

बैठकीत ट्रकमालकांनी काही मुद्दे मांडले. नव्याने सुरू होणारा खाण व्यवसाय किती काळ चालणार आणि तो शाश्वत असेल का, याबाबत स्पष्टता मागितली. अनेकांनी रस्ता वाहतूक कर आधीच भरला असून काम नसल्याने तो वाया गेल्याची खंत व्यक्त केली. नव्याने लागू होणारे कर आणि इतर शुल्क रद्द करावेत, अन्यथा ते भरण्यासाठी निधी कुठून आणायचा, असा सवालही उपस्थित करण्यात आला.

सरकारला कायमस्वरूपी खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ठोस पावले न उचलल्यास पुढील बैठकीत थेट आंदोलनाचा निर्णय घेण्याचा इशारा देण्यात आला. बैठकीला सावर्डे व परिसरातील ट्रकमालक, चालक व खाण अवलंबित उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Section 39A: सांत-आंद्रे भू-रुपांतर प्रकरणाचा पेच वाढला! हायकोर्टाची सरकारला नोटीस; '39-अ'चा वापर आता भोवणार?

Horoscope 29 April 2026: बुध-चंद्राची युती ठरणार लकी! 'या' राशींना लाभणार कुबेराचा खजिना, तर काहींना खर्चाचा फटका

VIDEO: "चिमुकल्यांचे हात-पाय बांधून अमानुष छळ!" डेकेअर सेंटरचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी 13 जणांना ठोकल्या बेड्या

Goa Professional League 2026: स्पोर्टिंग क्लब द गोवाचा 'विराट' विजय! डॉयल अल्विसची शानदार हॅटट्रिक अन् प्रोफेशनल लीगच्या जेतेपदावर तिसऱ्यांदा कोरलं नाव

Goa River Drowning Cases: गोव्यात बेफिकिरीमुळेच बुडण्याच्या घटनांमध्‍ये होतेय वाढ! सत्तरी तालुक्‍यातही चिंता; मद्यसेवन, सुरक्षेअभावी नद्या बनल्‍या धोकादायक

SCROLL FOR NEXT