South Goa Dainik Gomantak
गोवा

South Goa : दक्षिणेत भाजप-काँग्रेसला समान संधी! ॲड. क्‍लिओफात कुतिन्‍हो

गोमन्तक डिजिटल टीम

South Goa :

सासष्टी, काँग्रेस पक्षाची सध्‍याची काम करण्याची पद्धत व नियोजन पाहता उत्तर गोव्यात भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांना ‘अँटी इन्‍कबन्सी’ घटक सतावत असले तरी तेच लोकसभा निवडणुकीत निवडून येण्याची शक्यता जास्त आहे.

दक्षिण गोव्यातही काँग्रेसची स्थिती वेगळी नसली तरी या मतदारसंघात लोक स्वत:च काँग्रेसच्या बाजूने प्रचारात सहभागी होण्याची शक्यता आहे. त्‍यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना जिंकण्याची समान संधी असल्याचे मत राजकीय विश्‍‍लेषक ॲड. क्‍लिओफात कुतिन्‍हो यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले.

कॅप्‍टन विरियातो हे युवा आहेत. कारगिल युद्धात भाग घेतलेले योद्धा आहेत. शिवाय दक्षिण गोव्यात कोळसा, रेल्‍वे दुपदरीकरण, तम्‍नार प्रकल्प, रानांचे संरक्षण या सर्व आंदोलनात सहभागी असल्याने दक्षिण गोव्यातील लोक त्यांच्याकडे एक योग्य व सक्षम उमेदवार म्‍हणून पाहत आहेत, असे ॲड. कुतिन्‍हो यांनी सांगितले.

भाजपने जेव्‍हा पल्लवी धेंपे यांना उमेदवारी जाहीर केली, तेव्हा भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला होता. पण त्याचा फायदा काँग्रेस पक्षाला उठवता आला नाही.

काँग्रेसची मदार युवा नेत्‍यांवर

काँग्रेसची मदार युवा नेत्यांवर आहे. यात केपेचे आमदार एल्टन डिकॉस्‍टा, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचा समावेश होतो. या तिघांनाही आपले भवितव्‍य स्थिर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल.

एल्टन यांना केपेत, युरी यांना सांगे व कुंकळ्ळीत तर अमित यांना कुडचडे व धारबांदोडा तालुक्यावर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. त्यामुळे फोंडा मतदारसंघात भाजप जे मताधिक्य घेईल, ते काही प्रमाणात तरी भरून काढता येईल, असे ॲड. क्‍लिओफात कुतिन्‍हो म्‍हणाले.

दिगंबर कामत, संकल्‍प आमोणकर

यांची भूमिका भाजपसाठी महत्त्‍वपूर्ण : २०१९ साली काँग्रेसचे उमेदवार फ्रान्‍सिस सार्दिन यांच्या प्रचारात दिगंबर कामत यांनी प्रमुख भूमिका निभावली होती. आता ते भाजपमध्‍ये असल्‍याने या पक्षाच्‍या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.

शिवाय संकल्प आमोणकर मुरगाव मतदारसंघात काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकतात. पण कॅप्टन विरियातो तेथील असल्याने बरोबरी होऊ शकते, असे मत क्‍लिओफात यांनी व्यक्त केले.

सासष्‍टीत तिसऱ्या पक्षाला संधी नाही

सासष्टी तालुक्‍यात काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांची कसोटी असेल. ‘आरजी’च्या उमेदवाराबद्दल बोलताना क्‍लिओफात यांनी सांगितले

की, लोकसभा निवडणुकीत भाजप व काँग्रेस व्यतिरिक्त तिसऱ्या पक्षाला येथे स्थान नाही. जर तिसऱ्या पक्षाला विजयाची संधी

असेल तरच लोक त्या पक्षाकडे अपेक्षेने पाहतील. पण सध्‍या तरी तिसऱ्या पक्षाबद्दल तशी स्थिती दिसत नाही. मात्र रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाला जी मते पडतील, ती काँग्रेसचीच असतील हे पण त्यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT