Pallavi Dempo Dainik Gomantak
गोवा

Pallavi Dempo: दामबाबांच्या चरणी 'पल्लवी'; शेकडो भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थिती

Pallavi Dempe: दक्षिणेत प्रचार: ढोल-ताशांच्या गजरात वास्कोत स्वागत

गोमन्तक डिजिटल टीम

Pallavi Dempe: दक्षिण गोवा भाजपच्या लोकसभा उमेदवार पल्लवी श्रीनिवास धेंपे यांनी वास्को येथील श्री दामोदर देवाचे दर्शन घेऊन आपल्या प्रचाराला सुरुवात केली.

दक्षिण गोव्यात वास्कोत पल्लवी धेंपे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, वास्कोचे आमदार कृष्णा (दाजी) साळकर व इतर भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काल मंगळवारी पणजीतील श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेत लोकसभा निवडणुकीतील उत्तर गोवा उमेदवार श्रीपाद नाईक व दक्षिण गोवा उमेदवार पल्लवी धेंपे या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडला होता.

तर आज दक्षिण गोवा लोकसभा उमेदवार पल्लवी धेंपे यांनी वास्कोचे ग्रामदैवत श्री दामोदर देवाचे दर्शन घेऊन आपल्या प्रचाराला सुरुवात केली.

सकाळी 11 वाजता पल्लवी धेंपे यांचे दामोदर मंदिराकडे आगमन झाले. यावेळी उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले.

शेकडो भाजपा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुवासिनींच्या हस्ते पुष्पवर्षाव करुन स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत नगरसेविका शमी साळकर, वास्को भाजापा गटाध्यक्ष दीपक नाईक, नगराध्यक्ष गिरीष बोरकर, जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात व इतर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संध्याकाळी ७ वाजता पल्लवी धेंपे यांचे मंत्री माविन गुदिन्हो यांच्या नवेवाडे येथील कार्यालयात जंगी स्वागत करण्यात आले. तेथे हितचिंतक, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांच्या समवेत मंत्री माविन गुदिन्हो, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संदीप सुद, संकल्प महाले, क्रीतेश गांवकर व इतर भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यकर्त्यांशी संवाद

दामोदर देवाचे दर्शन घेतल्यानंतर पल्लवी धेंपे व सदानंद शेट तानावडे यांनी ११.३० वा. उद्योजक परेश जोशी, नंतर ११.४५ वाजता उद्योगपती नारायण बांदेकर कुटुंबियांची भेट घेतली. दोन्ही ठिकाणी चहा फराळ घेतल्यानंतर झेड स्क्वेअर सभागृहात दुपारी १२.३० वा. उद्योजक, ३ वा. नगरसेवकांशी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

SCROLL FOR NEXT