Goa Road
Goa Road Dainik Gomantak
गोवा

Goa Road : रस्ते सुरक्षा आराखडा तयार करणार; वाहतूक व्यवस्थापनासाठी मडगावात उपाययोजना

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Road :

सासष्टी, माथानी साल्ढाणा प्रशासकीय इमारतीतील सभागृहात जिल्हाधिकारी आश्र्विन चंद्रू यांच्या अध्यक्षतेखाली आज दक्षिण गोवा रस्ते सुरक्षा समितीची बैठक झाली. या बैठकीत वाहतूक व्यवस्थापनासाठी विविध उपायांवर चर्चा करण्यात आली. रस्ते सुरक्षा आराखडा तयार करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

या बैठकीला दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनेत कोतवाले, वाहतूक पोलिस उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर, ‘गोवा कॅन’च्या लॉर्ना फर्नांडिस, तसेच सार्वजनिक बांधकाम आणि वाहतूक खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

खात्यांमध्ये समन्वयाचा अभाव

रस्ते सुरक्षेसंदर्भात सर्व संबंधित सरकारी खात्यांमध्ये समन्वय महत्त्वाचा असतो. मात्र, त्याचा येथे अभाव जाणवतो, अशी खंत ‘गोवा कॅन’च्या लॉर्ना फर्नांडिस यांनी व्यक्त केली. सीसीटीव्ही कॅमेरे, गतिरोधक, पश्र्चिम बगल रस्त्याचे काम, रस्ता रुंदीकरण या विषयांवरही बैठकीत चर्चा झाली. रस्ते सुरक्षेसंदर्भात राजपत्रामध्ये अनेक अधिसूचना नोंद आहेत. मात्र, त्याविषयी या बैठकीत चर्चा झाली नाही, असेही फर्नांडिस यांनी सांगितले.

मोकाट गुरांवर होणार कारवाई

मडगाव आणि कुंकळ्ळी येथील बस स्टॅण्डची पाहणी करून तेथे सुधारणा करण्यासाठी आराखडा तयार केला जाईल. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या मोकाट गुरांवर कारवाई करण्यासाठीचा स्वतंत्र बैठक बोलावली जाईल, असे सांगण्यात आले. वाहतूक पोलिस उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर म्हणाले की, वाहतूक नियमांचे जे उल्लंघन करतात, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. रस्ता सुरक्षेबद्दल सरकारला प्रस्ताव सादर केल्याची माहिती त्यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Goa: म्हापशात 510 किलो पनीरसह कांदा जप्त; एफडीएकडून दुसऱ्यांदा कारवाई

Goa Crime: कौटुंबिक वादातून महिलेने उचललं मोठ पाऊल; पोटच्या मुलांना फिनाईल पाजत केला आत्महत्येचा प्रयत्न

Mormugao Sada: सडा परिसरात लवकरच उभे राहणार प्राथमिक आरोग्य केंद्र; मुख्यमंत्री सावंत

FC Goa: नुवेच्या रॉलिन बोर्जिस याच्याशी एफसी गोवाचा कायमस्वरुपी करार, अनुभवाचा होणार फायदा

Goa Today's Live News: गोव्याच्या विनाशावर भाजपचे मौन; युरी आलेमाव

SCROLL FOR NEXT