Margao Dainik Gomantak
गोवा

Margao News : ‘सोनसडो‘संदर्भात मुदत पाळण्‍यात अपयश; याचिकादाराची सरकार, नगरपालिका, संबंधित आमदारांवर टीका

Margao News : ठेकेदारानेही संरक्षक भिंत बांधण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा अवधी मागितला असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव, सोनसडोशी संबंधित उच्च न्यायालयात असलेल्या प्रकरणातील याचिकादार रॉक मास्कारेन्हस यांनी उच्च न्यायालयाची मुदत पाळण्यात अयशस्वी झाल्याबद्दल राज्य सरकार, मडगाव नगरपालिका आणि मडगाव, फातोर्डा व कुडतरीच्या आमदारांना फटकारले आहे.

न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा विचार करणाऱ्या मास्कारेन्हस यांनी पावसाळा सुरू असल्यामुळे सर्व कामे पूर्ण करण्यासाठी डिसेंबर, २०२४ ची एकंदरित अंतिम मुदत तरी पालिका पाळू शकेल का, असा प्रश्न केला आहे.

विलंबासाठी इतरांना दोष दिल्याबद्दल त्यांनी पालिकेवर टीका केली आहे. मास्कारेन्हस यांनी निदर्शनास आणून दिले की, पालिकेने अद्याप सोनसडो येथे १५ टीपीडी बायोरेमेडिएशन प्रकल्प उभारलेला नाही आणि उच्च न्यायालयाने जारी केलेल्या चार ते पाच इतर निर्देशांच्या पालनासाठी आणखी वेळ मागितला आहे.

ठेकेदारानेही संरक्षक भिंत बांधण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा अवधी मागितला असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

सोनसडाे संदर्भातील उच्चाधिकार समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांनी बैठक का बोलावली नाही आणि पालिका क्षेत्राशी निगडित असलेल्या मडगाव, फातोर्डा आणि कुडतरी या तीन आमदारांनी बैठक का घेतली नाही. याबाबत चौकशी करण्यासाठी किंवा मुख्यमंत्र्यांकडून आवश्यक फाईल्स मंजूर करून घेण्यासाठी हस्तक्षेप का केला नाही, असा सवाल मास्कारेन्हस यांनी केला आहे. गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळदेखील या प्रकरणात प्रतिवादी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

आमच्या राय गावातील लोक सोनसडोवरील कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे त्रस्त आहेत. सुमारे पाच वर्षांपूर्वी दाखल केलेल्या आपल्या याचिकेमुळे सोनसडोवरील डंप हटविण्यात आले; परंतु अजून बरेच काही करण्याची गरज आहे. संबंधित अधिकारिणी अधिक तत्परतेने कार्य करून आवश्यक शिल्लक कामे पूर्ण करण्याच्या बाबतीत आणखी विलंब टाळतील, अशी आशा आहे.

- रॉक मास्कारेन्हस, कुडतरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Film On Ram Temple: राम मंदिरावर गोव्यातील कॅथलिक मंत्री बनवणार चित्रपट; 'अयोध्या - द फायनल आर्ग्युमेंट'मधून उलघडणार इतिहास

Goa News Live Updates: पिसुर्ले कुंभारखण येथे दीड किलो गांजासह एकाला अटक, वाळपई पोलिसांची कारवाई

Goa Smuggling: 2 लाखांच्या खैरीच्या लाकडांची तस्करी रोखली! वन अधिकाऱ्यांची कारवाई; धारबांदोड्यात तिघांना घेतले ताब्यात

Vasco Khariwada: खारीवाडा येथे घाऊक मासळी विक्री ठप्प! ग्राहकांत नाराजी; मार्केटातील विक्रेते आक्रमक, पोलिस तैनात

Goa Accidental Death: 192 दिवसांत 143 मृत्‍यू! गोव्यात नेमकं चाललंय काय? 45% बळी युवावर्गाचे

SCROLL FOR NEXT