Sonsodo Garbage Fire Dainik Gomantak
गोवा

Sonsodo Garbage Fire: सोनसोडो कचरा प्लांटमध्ये पुन्हा आग; अग्निशमन दलाच्या जवानांची घटनास्थळी धाव

या घटनांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा अशी मागणी स्थानिक करत आहेत.

दैनिक गोमन्तक

Sonsodo Garbage Fire: मडगावातील सोनसोडो कचरा प्लांट सतत वादाच्या भोवऱ्यात असतो. तिथल्या स्थानिकांनी याला विरोध करूनही सोनसोडो कचरा समस्या सुटण्याचे नाव घेत नाही. त्यामध्ये कचरा प्लांटला सतत लागणाऱ्या आगींमुळे स्थानिक हैराण झाले आहेत. आज सकाळी सुद्धा सोनसोडो कचरा प्लांटला पुन्हा आग लागण्याची घटना घडली आहे.

माहितीनुसार, आज (30 जून) सकाळी 8.30 च्या सोनसोडो कचरा प्लांटमध्ये असलेल्या एका शेडला आग लागली. आत असलेल्या कचऱ्यामुळे ही आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आगीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मडगाव अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. यासाठी 12 हजार लीटर पाण्याचा वापर करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. आग मोठी नसल्याने ती लवकर आटोक्यात आली. मात्र या घटनांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा अशी मागणी स्थानिक करत आहेत.

दरम्यान, सोनसोडो कचरा विल्हेवाटीचा प्रश्न जटील होत चालल्याने मडगाव नगरपालिकेने त्यासाठी 14 कोटी रुपयांच्या खर्चाच्या कामाचा प्रस्ताव सरकारपुढे सादर केला होता. ही रक्कम मंजूर करुन घेण्यासाठी दिगंबर कामत प्रयत्न करणार होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT