SONG VIRAL Criticism of Goa government through song
SONG VIRAL Criticism of Goa government through song 
गोवा

SONG VIRAL:गाण्याच्या माध्यमातूनही गोवा सरकारला चिमटे

गोमंन्तक वृत्तसेवा

पणजी : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने(Goa Corona Second Wave) उग्र रूप धारण केल्यानंतर आणि वाढत्या रुग्णसंख्येबरोबर बळीचे आकडेही वाढू लागल्यावर लोकांकडून समाजमाध्यमांतून(Social Media) सरकारवर विविध प्रकारे होणारी टीकाही वाढण्यास सुरवात झाली. कोणी मुख्यमंत्री(CM Pramod Sawant), आरोग्यमंत्री(Health Minister Vishvajit Rane) व सरकारातील अन्य घटकांवर मिम्स(Mimes) तयार करून टाकले आहेत. कोणी विनोद घालू लागले आहे, कोणी अगदी तिखट प्रतिक्रिया व्यक्त करू लागले आहे. याच मालिकेत आता गाण्याच्या(Song) माध्यमातूनही सरकारला चिमटे काढण्यात येऊ लागले आहेत.(SONG VIRAL Criticism of Goa government through song)

यासंदर्भात फेसबुक व अन्य समाजमाध्यमावर एक गीत सध्या फिरू लागले असून सरकारवर त्याच्यात करण्यात आलेली प्रखर टीका लोकांना आवडली असल्याचे दिसत आहे. कोरोनाची परिस्थिती आणि ती हाताळण्यात सरकारला आलेले अपयश याला धरून हे गीत तयार करण्यात आलेले आहे.सदर गीत कोकणीतून असून प्रसिद्ध संगीतकार सिद्धनाथ बुयांव यांनी ते संगीतबद्ध केलेले आहे‌ तसेच गायलेले आहे. मडगावातील विख्यात कोकणी गीतकार साईश पाणंदीकर यांनी हे गीत लिहिले आहे.या गीताला विविध समाजमाध्यमांवर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

काय म्‍हटले गीतात..?
‘मनाक जाता यातना, दशा ही चोयतना, झाडपाल्याचो दोतोर म्हण्टा भिवपाची गरज ना’ अशा पंक्तीनी हे गीत सुरू होते. ‘केले गेले वयतलें, आता सायबा चलचे ना’ असा चिमटा त्यात काढण्यात आलेला आहे. लोक मरायला लागले, तरी भाजप अजून अभ्यास करत आहे, अशा आशयाची ओळ या गीतामध्ये आढळते.‌ सरकारला लोकांचे काहीच पडून गेलेले नसून लाजही राहिलेली नाही. मात्र, लोकांचा जीव गुदमरू लागला असून त्यांना ऑक्सिजन मिळत नाही, अशी टीका त्यातून करण्यात आली आहे. लॉकडाऊन शब्द उच्चारायला भाजप का घाबरतो? असा सवाल करून या गीताची‌ समाप्ती होते. सध्या कोरोना बळींचा आकडा फारसा कमी झालेला नसला, तरी संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर रूग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. तरीही या गीताला चांगली दाद मिळणे कायम आहे. कोरोना महामारी आल्यानंतर समाजमाध्यमावर व्यक्त झालेल्या काही प्रतिक्रिया, टिप्‍पणी प्रचंड गाजल्या. मध्यंतरी ‘डायरेक्ट चंद्रार’ हा उल्लेख खूप प्रसिद्ध झाला होता. तितके हे गीत गाजलेले नसले, तरी बऱ्यापैकी लोकप्रिय झालेले दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT