गोवा

Sonali Phogat: 'पीएनेच केला अत्याचार अन् खून', सोनाली फोगाट कुटुंबियांचे गंभीर आरोप

सोनाली फोगाट यांचा मृतदेह दिल्लीतून, हरियाणाला नेला जाणार

गोमन्तक डिजिटल टीम

भाजप नेत्या सोनाली फोगाट (Sonali Phogat Death) यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे गोव्यासह देशात खळबळ निर्माण झाली आहे. फोगाट यांचा मंगळवारी (दि.23) गोव्यात मृत्यू झाला. त्यानंतर फोगाट यांच्या कुटुंबियांनी या घटनेवर संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली. त्यानंतर आता या प्रकरणात हणजूण पोलिस ठाण्यात स्वीय सहाय्यक आणि आणकी एक जणाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या सगळ्या प्रकरणात सोनाली फोगाट यांच्या भावाने फोगाट यांचा स्वीय सहाय्यक आणि सहाय्यकाचा मित्र यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

'पीएने आणि त्याचा मित्र यांनीच केला अत्याचार अन् खून'

सोनाली फोगाट यांचा भाऊ रिंकू ढाका यांनी फोगाट यांचा स्वीय सहाय्यक सुधीर सांगवान आणि सहाय्यकाचा मित्र सुखविंदर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या दोघांनीच सोनाली यांच्यावर लैगिंक अत्याचार करून नंतर खुन केल्याचे रिंकू यांनी म्हटले आहे.

सोनाली यांनी त्यांच्या स्टाफ बाबत तक्रार केली होती. त्यांचा पीए सुधीर सांगवान याने जेवणात अंमली पदार्थ मिसळून त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार केला असे रिंकू म्हणाले. आरोपी सांगवान याने सोनाली यांना धमकी देखील दिल्याचे रिंकू यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

सोनाली फोगाट यांचा भाचा मोनिंदर फोगाट यांनी देखील आमचा संशय नाही तर दावा आहे की असेच झाले आहे. असे म्हटले आहे.

सोनाली फोगाट यांची मुलगी यशोधरा हिने देखील आपल्या आईसाठी न्यायाची मागणी केली आहे. याप्रकरणात निष्पक्ष आणि सखोल तपास व्हावा अशी मागणी तिने केली.

शवविच्छेदनाचा अहवाल- सोनाली फोगाट यांच्या शरीरावर जखमेचे व्रण

सोनाली फोगाट यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून, यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोनाली फोगाट यांच्या शरीरारवर अनेक जखमांचे व्रण आढळून आल्याचे या अहवालात म्हटले आहे. दरम्यान, सोनाली यांचा केमिकल आणि सेरॉजिकल अहवाल राखून ठेवण्यात आलाय. (Sonali Phogat Postmortem Report)

गोव्याचे पोलिस महानिरिक्षक ओमवीर सिंह बिष्णोई यांनी सोनाली फोगाट यांचे शरीर महिला पोलिस अधिकाऱ्याने तपासले तेव्हा त्यावर जखम न दिसल्याचे त्यांनी सांगितले.

दिल्लीच्या एम्समध्ये पुन्हा करणार शवविच्छेदन

सोनाली फोगाट यांचा भाऊ रिंकू म्हणाले की गोव्यात झालेल्या शवविच्छेदन आम्हाला मान्य नाही, त्यावर आमचा विश्वास नाही. दिल्लीतील एम्समध्ये पुन्हा शवविच्छेदन करणार असल्याचे रिंकू म्हणाले. माझी बहिण भाजपसाठी पूर्णपणे समर्पित होऊन काम करत होती, पण एकही भाजप नेता यावेळी मदतीला आला नसल्याचे रिंकू म्हणाले.

सोनाली फोगाट यांचे शव दिल्लीतून जाणार हरियाणाला

सोनाली फोगाट यांचे शव आज गोव्यातील दाबोळी विमानतळावरून दिल्लीसाठी रवाना झाले आहे. गोमेकॉतून काही वेळापूर्वीच विमानतळावर त्यांचे पार्थिव आणले होते. दिल्लीतून पुढे फोगाट यांच्या मुळ गावी म्हणजेच हिस्सार येथे नेले जाणार आहे.

राजकारण आणि कलाजगताशी संबंध

सोनाली फोगाट या भाजपच्या नेत्या होत्या त्याचबरोबर त्यांचा कलाजगातही वावर होता. भाजपच्या तिकीटावर त्यांनी अदमपूर येथून कुलदीप बिष्णोई यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. तसेच, 2020 मध्ये त्या प्रसिद्ध टिव्ही शो बिग बॉस मध्येदेखील दिसल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT