Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Pernem Crime: 'तुला आज दाखवतोच', म्हणत पेडण्यात मुलाने आईवर कोयत्याने केला जीवघेणा हल्ला; मुलाला अटक

Goa Crime News: मुलाने रागाच्या भरात आईचे डोके, मानेसह छातीवर कोयत्याने गंभीर वार केले. यात महिला गंभीर जखमी झाली असून, रक्तबंबाळ झाली.

Pramod Yadav

पेडणे: पोटच्या मुलाने आईवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला, यात आई गंभीर जखमी झाली आहे. पेडणे तालुक्यातील आगरवाडा येथे रविवारी (१५ जून) ही घटना घडली. याप्रकरणी पेडणे पोलिसांनी २५ वर्षीय मुलाला अटक केली आहे. तर, जखमी महिलेवर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 चंद्रशेखर चंद्रकांत पाटील (वय २५, रा. आगरवाड, पेडणे) असे अटक करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. सुषमा कळंगुटकर यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

चंद्रशेखर आणि त्याची आई यांच्या रविवारी दुपारी वाद झाला. वादातून त्याने आईला शिवीगाळ करत ‘आज तुला दाखवतोच’, म्हणत कोयत्याने वार केले. यात महिला गंभीर जखमी झाली आहे.

मुलाने रागाच्या भरात आईचे डोके, मानेसह छातीवर कोयत्याने गंभीर वार केले. यात महिला गंभीर जखमी झाली असून, रक्तबंबाळ झाली. जखमी महिलेला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी मुलाला अटक केली असून, याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT