Someya Kumari From Goa Cleared UPSC  Dainik Gomantak
गोवा

विना कोचिंग क्लास गोव्याच्या लेकीचे UPSC परीक्षेत यश; CM सह सर्वांनी केलं कौतुक

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमय्या कुमारीचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Pramod Yadav

Someya Kumari From Goa Cleared UPSC: नुकत्याच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागला, यावेळी प्रथम तीन क्रमाकांवर मुलींनीच बाजी मारली आहे. गोव्यातील देखील मुलीने UPSC परीक्षेत यश मिळवले आहे. वेरोडा - कुंकळ्ळी येथील सोमय्या कुमारी हिने परीक्षेत देशभरातून 502 वा क्रमांक पटकावला आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमय्या कुमारीचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सोमय्या कुमारीचे वडील भारतीय सैन्यदलाचे निवृत्त अधिकारी आहेत. 2005 मध्ये बिहारमधून त्यांची गोव्यात बदली झाली. अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर सोमय्या UPSC परीक्षेची तयारी करत होती. सिव्हिल विषयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर तिने अभ्यासाला सुरूवात केली. दरम्यान, तिने पर्यावरण विषयात एम टेक देखील केले आहे.

UPSC परीक्षेच्या चौथ्या प्रयत्नात तिला यश मिळाले आहे. विशेष बाब म्हणजे सोमय्याने परीक्षेसाठी तयारी करताना कोणत्याही प्रकारचा क्लास अथवा कोचिंग घेतले नाही. स्वत:च्या जोरावर तिने परीक्षेत मोठे यश संपादन केले आहे.

सोमय्या गोवन, बिहारी, पंजाबी आणि गुजराती अशा समिश्र वातावरणात वाढली आहे. फोंडा येथील केंद्रीय विद्यालयातून तिने शिक्षणाला सुरूवात केली. कुंकळ्ळी येथून तिने दहावीचे शिक्षण पूर्ण केले. लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीतून तिने अभियांत्रिकीची पदवी घेतली. तर, सुरत येथील NIT मधून तिने पर्यावरण विषयात एम टेक केले आहे.

दरम्यान, परीक्षेसाठी तयारी करताना ऑनलाईन माध्यांवरून माहिती घेण्याचा फायदा झाला. असे कुमारीने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीतील धरालीमध्ये ढगफुटी, अनेक घरं गेली वाहून; 4 जणांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO

Shubman Gill: मालिकावीर शुभमन गिलला पदकासोबत मिळाली 'दारूची बाटली', कारण काय? किती आहे किंमत? जाणून घ्या

Konkani Language: 38 वर्षांत राजपत्र कोकणीतून प्रकाशित करण्याचा प्रयत्नही कुठल्या सरकारला करता आला नाही; भाषा अभिमान आणि वास्तव

Satyapal Malik: "गोवेकरांची जगण्याची पद्धतच अनोखी" गोव्याचं कौतुक करताना थकत नव्हते सत्यपाल मलिक

Goa Assembly Live: माजी राज्यपाल स्व. सत्यपाल मलिक यांना विधानसभेत श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT