Som Yag Yadnya 2023 Dainik Gomantak
गोवा

Som Yag Yadnya 2023: गोव्यात यज्ञ उत्सव, कधी आणि कुठे वाचा सविस्तर

पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी 6 दिवस कार्यक्रम

दैनिक गोमंतक

Som Yag Yadnya 2023: परशुरामांची भूमी अशी ओळख असलेल्या गोव्यातील पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धनासाठी गोमन्तक - सकाळ समूहातर्फे सोमयाग यज्ञ उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा दिवस हा यज्ञ उत्सव चालणार आहे.

म्हापसा येथे 5 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत सकाळ, गोमन्तक आणि गोमन्तक टाइम्सतर्फे ‘सोम याग यज्ञ महोत्सव 2023’ होईल. या सहा दिवसांतील अनुभव प्रसन्न करणारा, स्वत:शी एकरूप करणारा आणि आध्यात्मिक स्वरूपाचा असेल. शांतता प्रस्थापित करणे तसेच गोव्यातील पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करणे हा ‘सोमयाग यज्ञ महोत्सवा’चा उद्देश आहे.

महोत्सव कुठे?

विश्वाटी विश्वेश्वर देवस्थान, म्हापसा-कळंगुट रोड, श्री देव बोडगेश्वर मंदिराजवळ, काणका, म्हापसा, गोवा

महोत्सव कधी?

5 ते 10 फेब्रुवारी 2023, वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत.

महोत्सवात नेमके काय?

ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद यांतील काही निवडक मंत्रांचे पठण यावेळी केले जाईल. आपल्यातील ऊर्जेला सकारात्मकतेकडे नेण्यासाठी पवित्र अग्नीही प्रज्वलित केला जाईल.

सोमयाग म्हणजे काय?

भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या यज्ञसंस्थेत पाकयज्ञसंस्था, हविर्यज्ञसंस्था आणि सोमयज्ञसंस्था असे तीन प्रकार आहेत. यातील सोमयागाचे अग्निष्टोम, प्रत्याग्निष्टोम, उक्य, षोडशिन, वाजपेय, अतिरात्र आणि अप्तोर्याम असे सात प्रकार असतात. सोम वनस्पतीचा रस काढून केला जाणारा यज्ञ म्हणजे सोमयाग.

ऋत्विज कोण?

अग्निहोत्री सुहोता दीपक आपटे हे गोव्यातील अग्निहोत्र व्रत स्वीकारणारी, आपटे कुटुंबातील तिसरी पिढी. त्यांचे वडील सोमयाजी दीपक आपटे व आजोबा सोमयाजी महादेव (सखा) आपटे हे त्रेताग्नी उपासक होते. अक्कलकोट निवासी परम् सद्गुरू श्रीगजानन महाराज यांच्या आज्ञेने 1963 मध्ये आजोबा श्रीसखा दीक्षित आपटे यांनी प्रथम अखंड त्रेताग्नि अग्निहोत्र व्रत स्वीकारले. त्यांनी हे व्रत अखंड 48 वर्षे श्रद्धेने केले. सुहोता आपटे यांनी पाच वर्षे गोव्यातील शांकर पाठशाळेत वैदिक शिक्षण घेतले. त्यानंतर घरी आजोबांपाशी कृष्ण यजुर्वेद शाखा अध्ययन केले व श्रौत (अग्निहोत्रादिक) अध्ययन आजोबांकडेच केले, आणि 2018 मध्ये अग्निहोत्र व्रत स्वीकारले व 2018 मध्ये अक्कलकोट येथे सोमयाग करून सोमयाजी झाले. सोमयाजी सुहोता दीपक आपटे व सुहोता समृद्धी दीक्षित आपटे हे उभय दाम्पत्य या अग्निष्टोम सोमयागाचे यजमानपद भूषविणार आहेत.

सोमयाग यज्ञ आणि त्याचे वैज्ञानिक फायदे?

सोमयाग यज्ञामुळे हवेतील प्रदूषणाचे कमी होऊ शकते, असं डॉ. प्रणय अभंग सांगतात. सोमयाग यज्ञामुळे हवेतील सूक्ष्मजीवांचा भार ९० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो, तसेच आजूबाजूच्या वातावरणातील अनेक विषाणू नष्ट होऊ शकतात किंवा निष्क्रिय होऊ शकतात. याशिवाय SOx चे प्रमाण सुरवातीच्या पातळीपेक्षा १० पटींपर्यंत कमी होते. या यज्ञाचे अनेक दीर्घकालीन परिणाम आहेत. प्रणय अभंग यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'यज्ञ आणि वैज्ञानिक अभ्यास' या विषयावर प्रबंध सादर केला होता. अभंग यांच्या प्रबंधानुसार NOx पातळी निश्चित केलेल्या मानकं किंवा थ्रेशोल्स पातळी ओलांडत नसल्याचेही निदर्शनास आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT