Som Yag Yadnya 2023
Som Yag Yadnya 2023 Gomantak Digital
गोवा

Som Yag Yadnya 2023: सोमयज्ञामुळे प्रदूषण कमी होते?, वाचा Research

गोमन्तक वृत्त्सेवा

Som Yag Yadnya Festival 2023 Goa

उष्णता आणि ध्वनी ही ऊर्जेची अंगे मानली जातात. या उष्णता आणि ध्वनीच्या ऊर्जेचा उपयोग यज्ञाच्या अनेक प्रकारातून सामान्यांच्या जीवनासाठी, आरोग्यासाठी व्हावा यासाठी यज्ञ ही संकल्पना अस्तित्वात आल्याचा उल्लेख पुराणात आढळतो. यज्ञ आणि त्याचे वैज्ञानिक फायदे यावर डॉ. प्रणय अभंग यांनी प्रबंध सादर केला होता. यात प्रबंधात नेमकं काय म्हटलंय हे जाणून घेऊया...

पंचमहाभूते आणि यज्ञ

पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते मानली गेली. या पंचमहाभूतांच्या समतोलात बिघाड होणं म्हणजे ऑक्सिजनची कमतरता निर्माण होणे, कार्बन डायऑक्साइड सारखे दूषित वायू वाढून ओझोनला भगदाड पडणे आदी गोष्टी होत राहतात.

मग याच पंचमहाभूतांचा समतोल साधण्यासाठी, निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी अग्निद्वारे आणि आकाश तत्त्व असलेल्या मंत्राद्वारे यज्ञ केले जातात. निसर्गाने जे जे उपयुक्त आपल्याला दिलंय ते ते अग्निद्वारे ईश्वराला अर्पण करावे असे आपल्या प्राचीन परंपरेत सांगितलं गेलंय.

सोमयाग का करतात?

समाजकल्याण, आरोग्य, पर्यावरण यासाठी सोमयाग हा यज्ञ सुचविण्यात आलाय. सोमयाग म्हणजे सोम वनस्पतीचा रस काढून वेदांमध्ये सांगितलेल्या पद्धतीने त्याचा देवतांसाठी करावयाचा यज्ञ. या यज्ञात अग्निकुंडात पेटविलेल्या अग्नीत औषधी तत्त्व असलेल्या अनेक गोष्टींची आहुती म्हणजेच गायीचे तूप, समिधा आणि इतर अनेक गोष्टी अर्पण केल्या जातात. हा यज्ञ पूर्ण करण्यासाठी ३ ते ७ दिवसांचा लागतो. वसंत ऋतूत मुख्यत्वेकरून हा याग करावयाचा असतो. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद यातील मंत्राचे पठण केले जाते.

सोमयाग आणि वैज्ञानिक दृष्टिकोन

प्रणय अभंग यांनी पुणे येथील उरुळी (देवाची) येथे सोमयाग झालेल्या ठिकाणी जवळपास २५ दिवसांची निरीक्षणे नोंदवली. यात त्यांनी सोमयाग केलेल्या ठिकाणी काय बदल होतात हे बघण्यासाठी यज्ञाच्या आधीच्या व नंतरच्या हवेची चाचणी केली.  सोमयाग  यज्ञाच्या  प्रयोगासाठी त्यांनी काही उद्दिष्ट्ये ठरवली होती. यात सोमयाग यज्ञातील धुराचा सभोवतालच्या सूक्ष्मजंतूंवर काय परिणाम होतो तसेच सोमयाग यज्ञातील धुराचा पर्यावरणातील हवेतील प्रदूषणावर होणाऱ्या परिणाम अभ्यासला जाणार होता.

हवेतील प्रमुख प्रदूषक म्हणजे सल्फर आणि नायट्रोजन ऑक्साइड. या प्रदूषकांव्यतिरिक्त काही रोगजनक सूक्ष्मजीवाणू देखील वायू प्रदूषणात करतात. सोमयाग यज्ञ वातावरणाला शुद्ध करत असल्याने त्याचे परिणाम प्रणय अभंग यांनी मूलभूत स्तरावर अभ्यासले.

प्रबंधातील निरीक्षणे

यज्ञाच्या धुराचे सभोवतालच्या सूक्ष्मजंतूंवर होणारे परिणाम अभ्यासण्यासाठी यज्ञाच्या आधीच्या व नंतरच्या जंतूंची संख्या मोजण्यात आली. या त्यांच्या संशोधनात असे आढळून आले की यज्ञापूर्वी प्रयोगाच्या ठिकाणची सूक्ष्मजंतूंच्या सरासरी ‘वसाहतींची’ संख्या ३४६ इतकी होती. मात्र यज्ञाच्या शेवटच्या दिवशी जवळपास ती १२ इतकी कमी झाली. थोडक्यात यज्ञ केल्यानंतर जवळजवळ ९५ टक्के सूक्ष्मजंतूंची वाढ थांबत असल्याचे सिद्ध झाले.

सल्फर डायऑक्साइडचे प्रमाण कमी

प्रयोगासाठी निवडण्यात आलेली जागा रहदारीच्या गजबजलेल्या ठिकाणी असल्याने तिथे हवेच प्रदूषण प्रचंड असल्याचे आढळले. पण सोमयाग यज्ञ केल्यावर हवेतील घातक सल्फर डायऑक्साइडचे प्रमाण दहा पटीने कमी झाल्याचे आढळून आले. नायट्रोजन डाय ऑक्साइडच्या बाबतीत या प्रयोगात खूप मोठी आकडेवारी हाती आली नाही मात्र यज्ञाच्या ठिकाणी नायट्रोजन ऑक्साइडची पातळी निश्चित केलेल्या मानकांची पातळी ओलांडत नसल्याचेही निदर्शनास आले.

सोमयागामुळे वायू प्रदूषण कमी होते

या अभ्यासावरून सिद्ध झालंय की सोमयाग यज्ञ हवेतील सूक्ष्मजीव तसेच सल्फर व नायट्रोजनच्या ऑक्साइड्सचे प्रमाण कमी करून वायू प्रदूषण नियंत्रित करू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Green Chilli Price Today : पणजी बाजारात गावठी मिरचीला मोठी मागणी

Loksabha Election : दक्षिण गोव्‍यातील ख्रिस्‍ती मतेही भाजपलाच; दामू नाईक, उल्‍हास तुयेकर यांचा दावा

CBSE Latest Update: सीबीएसई रिझल्टपूर्वी मोठी बातमी! बोर्डाने जारी केला ॲक्सेस कोड; जाणून घ्या

Panaji News : ‘तनिष्का पुरुमेंत फेस्त’ला प्रतिसाद; खवय्यांना पर्वणी

Lemon Rate In Goa : तप्त उन्हात लिंबू खातोय भाव; दरात वाढ

SCROLL FOR NEXT