
Horoscope 12 August 2025: उद्या म्हणजेच 12 ऑगस्ट, मंगळवारचा दिवस ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींसाठी विशेष फलदायी ठरणार आहे. उद्याच्या दिवशी चंद्र मीन राशीमध्ये प्रवेश करत आहे. यासोबतच, मंगळवार असल्यामुळे मंगळ ग्रह दिवस स्वामी असेल, जो चंद्रासोबत 'समसप्तक योग' तयार करेल. तसेच, बुध ग्रहाचे सूर्यासोबत कर्क राशीमध्ये गोचर झाल्यामुळे 'बुधादित्य योग' बनणार आहे. या शुभ योगांसोबतच शतभिषा आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्रांच्या संयोगात 'सुकर्मा' आणि 'सर्वार्थ सिद्धी योग' देखील जुळून येत आहेत.
भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया आणि त्यानंतर चतुर्थी तिथी आहे. अशा शुभ योगांच्या आणि ग्रहस्थितींच्या प्रभावामुळे हनुमानजींच्या कृपेने वृश्चिक राशीसह एकूण 5 राशींसाठी उद्याचा दिवस अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे. चला तर मग जाणून घेऊया उद्या कोणत्या राशींचे नशीब चमकणार आहे.
उद्याचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक परिणाम घेऊन येईल. तुम्हाला व्यवसायात अपेक्षित फायदा मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. नफा मिळवण्यासाठी उद्याचा दिवस खूप चांगला आहे. जवळच्या मित्रांचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्या सामाजिक वर्तुळात वाढ होईल आणि कुटुंबात सुख-शांती नांदेल. तसेच, तुमच्या जुन्या इच्छा पूर्ण होऊ शकतात, ज्यामुळे तुमचे मन आनंदी राहील. याशिवाय, वैवाहिक जीवनातही रोमान्स राहील आणि तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील.
वृषभ राशीसाठी मंगळवारचे उपाय: हनुमानाला तुळशीच्या पानांची माळ अर्पण करा आणि 'राम रक्षा स्तोत्र'चा पाठ करा.
मिथुन राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस खूप खास असणार आहे. तुम्ही तुमच्या कामाबद्दल अधिक गंभीर राहाल, ज्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी उद्याचा दिवस विशेष लाभदायक ठरु शकतो. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तसेच, वरिष्ठ तुमच्या विचारांचा आदर करतील. सेना, पोलीस किंवा सुरक्षा दलातील लोकांना त्यांच्या कामात यश मिळेल. तुमच्या मेहनतीचे पूर्ण श्रेय मिळेल आणि मान-सन्मानात वाढ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा राहील.
मिथुन राशीसाठी मंगळवारचे उपाय: हनुमानाला पानाचा विडा अर्पण करा आणि माकडांना गूळ आणि चणे खाऊ घाला.
कन्या राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस अपेक्षेपेक्षा जास्त चांगला राहील. व्यवसायात तुम्ही ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमच्या कामाला गती मिळेल. नवीन काम सुरु करण्याचा विचार करत असाल, तर उद्याचा दिवस अनुकूल आहे. भागीदारीत काम करणाऱ्यांना जास्त फायदा होऊ शकतो. तुमच्या बिझनेस पार्टनरचा पूर्ण पाठिंबा मिळेल आणि विश्वास अधिक वाढेल. कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या लग्नात काही अडचण येत असेल, तर ती उद्या दूर होऊ शकते.
कन्या राशीसाठी मंगळवारचे उपाय: हनुमान मंदिरात लाल झेंडा अर्पण करा आणि नंतर तो तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर किंवा छतावर लावा. यामुळे नकारात्मकता दूर होईल.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस फायदेशीर ठरेल. तुम्हाला तुमच्या भूतकाळातील प्रयत्नांचे अनपेक्षित फळ मिळेल. जुन्या ओळखींचा फायदा होईल आणि त्यांच्या मदतीने व्यवसायासाठी चांगली डील मिळण्याची शक्यता आहे. क्रिएटिव्ह काम करणाऱ्यांसाठी उद्याचा दिवस त्यांच्या कामाला नवी ओळख मिळवून देणारा असेल. तुमच्या कार्याची सार्वजनिक ठिकाणी प्रशंसा होईल. विद्यार्थ्यांसाठीही उद्याचा दिवस चांगला आहे. कुटुंबात सुखद वातावरण असेल आणि मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते. वैवाहिक जीवन सुखद राहील.
वृश्चिक राशीसाठी मंगळवारचे उपाय: हनुमानाला शेंदूरचा चोळा अर्पण करा आणि गरजूंना अन्न दान करा.
धनु राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस खूप चांगला असेल. तुम्हाला व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त चांगले परिणाम मिळतील. विशेषतः प्रॉपर्टी डीलिंग, रिअल इस्टेट आणि ट्रान्सपोर्टशी संबंधित लोकांना चांगला नफा होऊ शकतो. कमिशनवर आधारित कामांमध्येही चांगला फायदा मिळेल. तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत राहाल. तुम्हाला वाहन सुख मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल, विशेषतः जवळच्या नातेवाईकांकडून अनपेक्षित मदत मिळू शकते. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील आणि वैवाहिक जीवन आनंदी असेल.
धनु राशीसाठी मंगळवारचे उपाय: कमीतकमी 7 वेळा हनुमान चालीसाचा पाठ करा आणि लाल रंगाच्या गाईला गूळ व पोळी खाऊ घाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.