Som Yag Yadnya 2023 Dainik Gomantak
गोवा

Som Yag Yadnya 2023: गोव्यात आजपासून महासोमयाग

दैनिक गोमन्तक

Som Yag Yadnya Festival 2023 Goa

आजपासून महासोमयाग : विश्‍वकल्याणासाठी गोमन्तक-सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजन

जगभरातील वाढते प्रदूषण आणि मानवी जीवनातील धकाधकीच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सकारात्मक ऊर्जानिर्मिती, वातावरण शुद्धी, मनोबल वृद्धी आणि आध्यात्मिक समाधानासाठी गोमन्तक-सकाळ माध्यम समूहाच्या वतीने 5 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत अग्निष्टोम महासोमयागाचे आयोजन करण्यात आले आहे.

या अग्निष्टोम महासोमयागासाठी यागाचे यजमान सोमयाजी सुहोता दीपक दीक्षित आपटे यांच्या निवासस्थानावरून शनिवारी अग्नीचे दिंडीने वाजत-गाजत यज्ञ स्थळावर आगमन झाले.

यावेळी विश्‍वाटी विश्‍वेश्‍वर मंदिर परिसरात काढण्यात आलेल्या सवाद्य दिंडीमध्ये भाविकांनी सहभाग घेतला. रविवारपासून (दि. 5) यज्ञस्थळावर पुण्याहवाचन, ऋत्विकवरण व यजमान दीक्षा ग्रहणाने यज्ञास सुरुवात होणार आहे. दुपारी सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

हा महासोमयाग सहा दिवस सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत होणार आहे. या यागाची सांगता 10 फेब्रुवारी रोजी सकाळी अवधृत स्नानाने होईल. या महासोमयागाच्या आध्यात्मिक परिणामांचे शास्त्रीय कसोटीवर परीक्षणही करण्यात येणार आहे.

याग काळात गोमंतकीयांनी मोठ्या संख्येने यज्ञस्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन गोमन्तक आणि सकाळ माध्यम समूहातर्फे करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT