Som Yag Yadnya 2023
Som Yag Yadnya 2023 Dainik Gomantak
गोवा

Som Yag Yadnya 2023: ३५ सोमयागांमध्ये सेवा देणारे आजोबा

दैनिक गोमन्तक

Som Yag Yadnya Festival 2023 Goa

अग्निहोत्र म्हणजे अग्न्यन्तर्यामी (अग्नीमध्ये) आहुती अर्पण करून केली जाणारी ईश्वरी उपासना असून, 1985 पासून मी ती करीत आहे. त्‍यामधून मला आत्‍मानंद मिळतो, असा अनुभव अनंत मुरलीधर शिधाये (66) यांनी सांगितला. ‘गोमन्तक-सकाळ’ माध्यम समूहातर्फे सध्या काणका विश्वाटी विश्वेश्वर देवस्थान परिसरात अग्निष्टोम महासोमयाग सुरू असून, शिधाये तेथे मनोभावे सेवाकार्य करत आहेत.

शिधाये हे निवृत्त भारतीय रेल्वे कर्मचारी असून 1981मध्ये त्यांनी पुण्यात अक्‍कलकोट येथे गजानन महाराजांचे पहिल्यांदा दर्शन घेतले. त्यानंतर ते गजानन महाराजांचे साधक बनले आणि तेव्हापासून ते अग्निहोत्रची उपासना करताहेत. 1985मध्ये त्यांनी भोपाळमध्ये पहिला सोमयाग अनुभवला; तर 1986मध्ये गुजरातमध्ये दुसऱ्यांदा.

आतापर्यंत शिधाये यांनी 35 महासोमयागांचा अनुभव घेतला असून, त्‍या-त्‍या ठिकाणी त्‍यांनी सेवाकार्य बजावले आहे. हा सोमयाग संपवून जगन्नाथपुरी येथे होणाऱ्या पुढील सोमयागस्थळी भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय रेल्वेचे कर्मचारी असताना शिधाये हे रजा टाकून महासोमयागचा आशीर्वाद घेण्यासाठी तसेच तिथे सेवाकार्य देण्यासाठी जायचे. निवृत्तीनंतर शिधाये यांनी 10 महासोमयाग अनुभवले.

कार्यप्रवणता निर्माण

शिधाये सांगतात की, नियमाने अग्निहोत्र करणाऱ्या विविध स्तरांतील व्यक्तींना अधिक समाधानकारक वाटते. जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास, मनःशांती तसेच संबंधितांमध्ये कार्यप्रवणता हे गुण निर्माण होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे अग्निहोत्राच्या औषधीयुक्त वातावरणामुळे रोगकारक जंतूंच्या वाढीस प्रतिबंध होतो. एकप्रकारचे संरक्षक कवच सभोवती असल्याची जाणीव होते.

भाविकांना कुतूहल

बुधवारी यज्ञस्थळी सकाळी प्रवर्ग्य विधी झाला. त्यानंतर उपसदईष्टी विधी, सुब्रमण्य आवाहन, प्रवर्ग्य उद्वासन, अग्निप्रणयण, अग्निक्षोम याग हे विधी पार पाडल्याची माहिती पुरोहित मंदार कुलकर्णी यांनी दिली. यज्ञस्थळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून या सोमयाग यज्ञाच्या विधी एखाद्या जिज्ञासूप्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

मनोभावे सेवा : शिधाये हे सध्या काणका येथे सुरू असलेल्या यज्ञस्थळी रात्रीच्या वेळी जागरण करून त्या जागेचे संरक्षण करतात. यावेळी ते यज्ञास प्रदक्षिणा घालत असतात. त्यानंतर पहाटे 5.30वा. तेथून निवासस्‍थानी जातात व दीड तास आराम करून पुन्हा आपली कामे उरकून माघारी यज्ञस्थळी येतात. ही ऊर्जा व ताकद मला याच यज्ञामधून मिळते. ज्यामुळे मला थकवा किंवा इतर त्रास होत नाही, असेही ते अभिमानाने सांगतात.

अनेक फायदे जाणवतात

आतापर्यंत मी 35 महासोमयागांचा अनुभव घेतला आहे. मिळेल तिथे जाऊन मी सोमयागस्थळी सेवा देतो. ईश्वरच माझ्याकडून ही सेवा करून घेतो. आपल्याला देवाने विवेकबुद्धी दिली असून तिचा वापर इतरांच्या कल्याणासाठी करावा. यज्ञस्थळी झाडू मारण्यापासून स्वयंपाकस्थळी लागेल ती मदत किंवा काम मी करतो. अग्निहोत्रमुळे आपल्या अंगी शिस्तपणा येतो. आपली निर्णयक्षमता वाढते व आपण अधिक नम्र होतो, असेही शिधाये सांगतात.

विश्व हे आपले कुटुंब असून, जनकल्याणार्थ अशाप्रकारचे महासोमयाग यज्ञ सर्वत्र झाले पाहिजेत व तिथे जाऊन मला सेवा देता येईल. - अनंत शिधाये, भाविक

शिधाये म्‍हणतात...

  • अग्निहोत्र करणे ही नित्योपासना आहे. ते एक व्रत आहे. ईश्वराने आपल्याला हे जीवन दिले आहे.

  • त्यासाठी तो आपल्याला पोषक सर्वकाही देतो. यानिमित्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रतिदिन अग्निहोत्र करणे हे आपले कर्तव्य आहे.

  • अग्निहोत्र हे आम्ही घरी नित्याने केले पाहिजे. तसेच हे विश्व आपलेच कुटुंब असून त्याचे संरक्षण करण्यासाठी अशी महासोमयाग यज्ञ प्रत्येक ठिकाणी कालांतराने होत राहिली पाहिजेत.

  • जेणेकरून वातावरण शुद्ध होईल व सृष्टीचे संरक्षण होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रादो 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT