Som Yag Yadnya 2023 : सोमयागाचे फायदे काय?, ऑस्ट्रियातून आलेल्या महिलेने दिलं उत्तर

Som Yag Yadnya 2023
Som Yag Yadnya 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Som Yag Yadnya Festival 2023 Goa

‘अग्निहोत्र समजून घेतल्यानंतर मला वेगळीच ऊर्जा मिळाली. याशिवाय सुरक्षिततेची भावनाही निर्माण झाली. महासोमयाग हा केवळ वैयक्तिक विकासासाठी नसून ते पर्यावरण व मानव निर्मितीच्या सुरक्षिततेसाठी एक सुरक्षा कवच आहे. मानवाप्रमाणे या अग्निहोत्राचा प्रभाव आपल्या आजूबाजूचे प्राणी-पक्षीही अनुभवतात’, असे मत ऑस्ट्रियातील योगशिक्षिका आस्ट्रिड यमुना ब्यूर यांनी व्यक्त केले.

‘गोमन्तक-सकाळ’ माध्यम समूहातर्फे काणका येथील विश्‍वाटी विश्‍वेश्‍वर देवस्थान परिसरात दुर्मीळ असा अग्निष्टोम महासोमयाग सुरू आहे. या सोमयागासाठी आस्ट्रिड (५१) या महिला आल्या आहेत. त्यांनी आपल्यासोबत अनेक विदेशी मित्रांनाही या महासोमयागासाठी निमंत्रित केले आहे. आस्ट्रिड या पाचव्यांदा भारतात आल्या आहेत.

सात वर्षांपासून त्या ‘अग्निहोत्र’चा सराव करतात. 2012 मध्ये शिवपुरीमधून अग्निहोत्र तसेच सोमयागाच्या प्रेमात पडल्याचे त्यांनी सांगितले. गतवर्षीच्या डिसेंबरमध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या लातूरमध्ये महासोमयाग अनुभवला. त्यानंतर आता पुन्हा काणका येथे अग्निष्टोम महासोमयागचा दुसरा अनुभव घेत आहेत.

Som Yag Yadnya 2023
Som Yag Yadnya 2023 Goa: 'वेदीकरण', 'प्रवर्ग्य'; असा पार पडला अग्निष्टोम महासोमयागाचा तिसरा दिवस

अग्निहोत्रामुळे पक्ष्यांसोबत स्नेहबंध

आस्ट्रिड यांनी आतापर्यंत चारवेळा पंचकर्माचा अनुभव घेतला आहे. त्या म्हणाल्या, ‘अग्निहोत्र करीत असल्याने माझे या अग्नीसोबत वेगळे नाते निर्माण झाले आहे. ऑस्ट्रियामध्ये माझ्या घरी बाल्किनी किंवा घरासमोरील गार्डनमध्ये अग्निहोत्राचा सराव करताना पक्षी माझ्याजवळ येतात. त्यांचा किलबिलाट एक वेगळा आनंद मला देतो. याचाच अर्थ अग्निहोत्रसोबत केवळ मनुष्यच नाही, तर पक्षीसुद्धा जोडले जातात.’

महासोमयागामुळे आपल्या जीवनात उर्जानिर्मिती तयार होण्यास मदत मिळते. वातावरण शुद्धी व आध्यात्मिकासोबत मनोमीलन करण्याचे हे एक उत्तम साधन आहे. यातील वेदाचे पठण, मंत्रोच्चार कानावर पडताच एका वेगळ्याच अनुभूतीशी आपला संपर्क होतो. ही शब्दांत व्यक्त करणारी गोष्ट नाही. प्रत्येकाने सोमयागस्थळी भेट देऊनच ती अनुभवावी. - आस्ट्रिड यमुना ब्यूर, योगशिक्षिका

Som Yag Yadnya 2023
Som Yag Yadnya 2023 Goa: विश्वकल्याणाचा संकल्प: अग्निष्टोम् महासोम यागास प्रारंभ

योगामुळे जीवन ऊर्जात्मक

एकोणीस वर्षांपासून आस्ट्रिड योग करत आहेत. ‘योगमुळे मी स्वतःला जास्त फिट व लवचिक अनुभवते. त्यामुळे प्रत्येकाने योगसोबत अग्निहोत्रची घरी प्रॅक्टिस करावी. असे केल्यास तुमचे जीवन अधिक ऊर्जात्मक राहिल. शिवाय घरामधील नकारात्मक उर्जा नष्ट होण्यास मदत मिळेल’, असेही त्या आत्मविश्वासाने सांगतात.

अग्निहोत्र म्हणजे काय?

ज्यांना मोठे यज्ञ शक्य नाही, अशांना आताच्या काळात नित्य यज्ञ घरातच करावा, असे वेदात सांगितले आहे. अग्नीमध्ये सकाळ-संध्याकाळ आहुती द्याव्या, असे अथर्ववेदात सांगितले आहे. या नित्य यज्ञालाच अग्निहोत्र असे म्हणतात.

अग्निहोत्र हा दैनंदिन केली जाणारी एक कृती असून सूर्योदय व सूर्यास्तावेळी घरामधील वातावरण पवित्र करण्यासाठी अग्निहोत्र यज्ञ केला जातो. अग्निहोत्र करताना अग्निकुंड, शेण्या, तूप, तांदूळ, तुपाची आहुती द्यायला पळी वापरली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com