Som Yag Yadnya 2023 Dainik Gomantak
गोवा

Som Yag Yadnya 2023: अवभृत स्नानाने आज सांगता

दैनिक गोमन्तक

Som Yag Yadnya Festival 2023 Goa

गोमन्तक-सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित अग्निष्टोम महासोमयागाचा आज (शुक्रवारी) शेवटचा दिवस आहे. अवभृत स्नानाने (नदीकाठी स्नान) या यागाची सांगता होणार आहे.

काणका येथील विश्वाटी विश्वेश्वर देवस्थान परिसरात विश्वशांतीसाठी अग्निष्टोम महासोमयागाचं आयोजन करण्यात आले होते. 5 फेब्रुवारी रोजी हा महासोमयाग सुरू झाला होता.

शुक्रवारी या सोमयागाची अवभृतईष्टी व पूर्णाहुती होईल. त्यानंतर दोन ईष्टी होऊन यज्ञाची सांगता होईल. अशी माहिती गुरुजी सिद्धांत गाडगीळ यांनी दिली.

  • पाचव्या दिवशी पार पडल्या या विधी

सकाळच्या विधीसत्रात स्वर्गप्रवेश देखील झाला. या विधीअंतर्गत सोमयागाचे यजमान सोमयाजी सुहोता दीपक आपटे आणि सुहोता समृद्धी दीक्षित आपटे या दाम्पत्यासह आपटे कुटुंबीयांनी डोक्यावर धोतर धरून सभामंडपात प्रवेश केला.

याच कृतीला ‘स्वर्गप्रवेश’ असे म्हटले जाते. यावेळी विविध वेदमंत्रांचे पठण करण्यात आले. गुरुवारी पाचव्या दिनी सभामंडप झेंडूची फुले तसेच केळीची झाडे यांनी आकर्षकरित्या सजवलेला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Employees Strike: शनिवारच्या सुट्टीसाठी बँक कर्मचाऱ्यांची आरपारची भूमिका; 40 मिनिटे अतिरिक्त कामाची तयारी, मात्र मागणी मान्य होईपर्यंत संप कायम

2027 च्या निवडणुकीत एकच ध्रुवीकरण हवे; '39-अ'चे समर्थक विरुद्ध '39-अ'चे विरोधक!

Lakshmi Narayanan Rajyog 2026: शुक्र-बुध युतीचा महाचमत्कार! लक्ष्मी नारायण योगाच्या प्रभावाने 'या' राशींवर होणार पैशाचा वर्षाव; संपत्तीत होणार बंपर वाढ

BSNL Tag Block Theft: 'बीएसएनएल'ला चोरांचा दणका, सासष्टीत टॅग ब्लॉकची चोरी; दूरध्वनी, इंटरनेट सेवा विस्कळीत

Goa Politics: फक्त निवडणुका आल्यावर यात्रा काढून उपयोग नाही! 'भाजप जनतेसोबत' म्हणत दामू नाईकांचा काँग्रेसला सणसणीत टोला

SCROLL FOR NEXT