सुभाष शिरोडकर Dainik Gomantak
गोवा

Goa Flood गिरी-म्‍हापसा पूर समस्‍या सोडविणार; सुभाष शिरोडकर

पुढील पावसाळ्‍यापूर्वी प्रश्‍‍न मार्गी लावण्‍याचा प्रयत्‍न

दैनिक गोमन्तक

Goa Flood Measures गिरी-म्‍हापसा येथे तार नदीत गाळ साचल्याने, महामार्ग बांधकामावेळी साकव बुजविले गेल्याने आणि भराव घातल्याने पूर येतो. त्यावर पुढील पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले. आमदार केदार नाईक यांनी याबाबत प्रश्न विचारला होता.

नाईक म्हणाले, गिरी येथे हॉटेल ‘ग्रीनपार्क’ परिसरात पुराचे पाणी साचून राहते. त्यामुळे शेत पाण्याखाली जाते. पाच मतदारसंघांतील शेतीला या पाण्‍याचा फटका बसतो. शेतीची नासाडी होते. त्‍यावर उपाययोजना करण्‍यासाठी सुमारे 1200 मीटरपर्यंत भिंत बांधावी लागेल.

पावसाळ्यापूर्वी हे काम होणे गरजेचे आहे. पिळर्ण येथे जलशुद्धीकरण प्रकल्प आकाराला येत आहे. त्यासाठी कच्च्या पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे का? असा सवालही त्‍यांनी केला.

त्‍यावर मंत्री शिरोडकर म्हणाले, पुराचे कारण तार नदी आहे. पुराचा अभ्यास करण्यात आलाय. असे दिसून आले आहे की सखल भागातून पुराचे पाणी शेतात घुसते.

महामार्ग बांधणीवेळी पाणी निचरा होण्‍याच्‍या अनेक परंपरागत वाटा बंद करण्यात आल्या. काही ठिकाणी भरावही घालण्यात आला. गटारे बुजली गेली. या सर्व गोष्‍टींमुळे पूर येतो. यासाठी प्रथम गाळ उपसावा लागेल व त्यानंतर गिरी येथील नाल्याची दुरूस्ती करावी लागेल. मयडेपर्यंत हे काम करावे लागणार आहे.

गिरी येथील पुराचे कारण तार नदी आहे. त्‍यावर उपाययोजना म्‍हणून पुढील पावसाळ्यापूर्वी या नदीतील गाळ उपसून नाल्‍याची दुरुस्‍ती केली जाईल. येत्या नोव्हेंबरमध्ये सदर काम सुरू करण्याचे नियोजन आहे. पिळर्ण जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम अद्याप व्हायचे आहे. ते पूर्ण होण्याआधी कच्चे पाणी तिथपर्यंत नेण्याची जलसंपदा खात्याची तयारी आहे.

- सुभाष शिरोडकर, जलस्रोतमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Today: पुढच्या पिढीसाठी गोवा जिवंत ठेवणे गरजेचे; सुरेश प्रभूंचे प्रतिपादन

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

Creative Minds of Tomorrow मध्ये 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी..

Goa Opinion: ‘घर नाही, पैसा नाही तरीही त्या दोघींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य माणुसकी शिकवणारं’

Health Tips: स्वतःकडे बरंच दुर्लक्ष होतंय, वेळ मिळत नाहीये; नेमकं करावं तरी काय?

SCROLL FOR NEXT