Union Jal Shakti Minister Gajendra singh Shekhwat & CM Dr Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: गृहमंत्र्यांनंतर जलशक्ती मंत्र्यांची भेट, शिष्टमंडळाला मिळाले मोठे आश्वासन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची आज दिल्लीत भेट घेतली.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हादईचे पाणी वळवण्यासाठी केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकला दिलेल्या ‘डीपीआर’ची मंजुरी रद्द करावी आणि तातडीने जल व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करावी, या मागणीसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची बुधवारी दिल्लीत भेट घेतली. (Mahadayi Water Dispute)

‘म्‍हादई जलवाटप अधिकारीणी स्‍थापन करण्‍याबाबत आपण लक्ष घालू’, असे शहा यांनी गोव्‍याच्‍या शिष्‍टमंडळाला सांगितले; तरंतु ‘डीपीआर’ आक्षेपाविषयी कोणतेही स्पष्ट आश्वासन दिलेले नाही. दरम्यान, त्यानंतर या शिष्टमंडळाने केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची भेट घेतली.

म्हादई पाणी वाटपाच्या समस्येवर लवकरच तोडगा काढला जाईल असे आश्वासन केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी दिले आहे. "गोव्याचे यशस्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत व त्यांच्या शिष्टमंडळासह आज दिल्लीतील निवासस्थानी बैठकीसाठी आले होते. आमच्यात म्हादई नदीच्या पाणी वाटपाबाबत विचार विनिमय झाला. निश्चित या समस्येवर लवकरच तोडगा काढला जाईल." असे ट्विट शेखावत यांनी केले आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हेच ट्विट रिट्विट करत या शेखावत यांच्याशी सहमती दर्शवली आहे.

दरम्यान, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार विनय तेंडुलकर, सभापती रमेश तवडकर, वनमंत्री विश्‍वजीत राणे, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, साबांखा मंत्री नीलेश काब्राल, आमदार चंद्रकांत शेट्ये यांच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री शहा यांची बुधवारी भेट घेऊन राज्यातील परिस्थितीची माहिती दिली.

या पाणी वळवण्यामुळे पर्यावरणासह उत्तर गोव्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होणार आहे, ही बाब शिष्टमंडळाने गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. यासाठी जल आयोगाने दिलेली डीपीआर मंजुरी मागे घ्यावी अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 2nd Test: 38 वर्षांपासून एकही पराभव नाही, 'दिल्ली'चं मैदान टीम इंडियासाठी लकी; जाणून घ्या काय सांगते आकडेवारी?

Goa Crime: ग्रील कापून घरात घुसले, दाम्पत्याला बांधून ठेवलं, 50 लाखांचा ऐवज केला लंपास; म्हापशात बुरखाधारी दरोडेखोरांची दहशत

Nobel Prize Physics 2025: भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर! क्वांटम मेकॅनिकल टनलिंगच्या शोधासाठी तीन शास्त्रज्ञांचा गौरव

Horoscope: उद्याचा दिवस खास! 8 ऑक्टोबर रोजी शुभ धन योगामुळे 5 राशींचे भाग्य उजळणार, गणेशाचा असेल विशेष आशीर्वाद

Goa Crime: बुरखाधारी टोळीचा हैदोस! ग्रील कापून घरात घुसले अन् दाम्पत्याला बांधलं, लाखोंची रोकड अन् दागिने घेऊन झाले पसार

SCROLL FOR NEXT