वाळपई: स्थानिकांना रोजगार देण्याबाबत आणि पर्यावरण रक्षणासंबंधी खाण कंपनी हमी देत असेल तर खाणीला पाठिंबा राहिल, अशी भूमिका सोलये परिसरातील ग्रामस्थांनी जनसुनावणीवेळी जोरदारपणे मांडली.
सुरुवातीला आयोजकांच्या वतीने या संपूर्ण खाण ब्लॉकची सविस्तरपणे माहिती देण्यात आली. सदर ब्लॉकचे खनिज उत्खननाचे काम अग्रवंशी कंपनीतून करण्यात येणार आहे. यासाठी ६१ हेक्टर क्षेत्रात उत्खनन होणार असून पाच मेट्रिक टन खनिज माल प्रत्येक वर्षी काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
स्थानिकांना रोजगारसंधी उपलब्ध करण्यावर भर देण्यात यावा. अशा प्रकारची मागणी करीत अनेकांनी या खाणीला पर्यावरणीय दाखला देण्याच्या दृष्टिकोनातून हरकत व्यक्त केली. तर काहींनी येणाऱ्या काळात खिळखिळी झालेली अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणायची असेल तर सदर खाण सुरू होणे अत्यंत गरजेचे असल्याचा मुद्दा पुढे करून या खाणीला आपल्या पूर्ण पाठिंबा व्यक्त केला.
या खाणीला आपला पाठिंबा व्यक्त करताना सुरला पंचायतीचे उपसरपंच सुभाष फोंडेकर यांनी जैवविविधतेवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही, याची विशेष जबाबदारी घेण्याचे आवाहन केले.
ही सुनावणी जवळपास पाच तास चालली. यामध्ये ५५ जणांनी मते मांडली. सुमारे ६०० ग्रामस्थांची उपस्थिती होती. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे शास्त्रज्ञ डॉ. मोहन गिरफ उत्तर गोवा जिल्हा अतिरिक्त जिल्हाधिकारी गुरुदास देसाई यांची उपस्थिती होती. यावेळी खबरदारी म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
होंडाचे सरपंच शिवदास माडकर, पिसुर्लेचे देवानंद परब, भिरोंडाचे उदयसिंग राणे, मोर्ले सरपंच अमित शिरोडकर यांनी तसेच लक्ष्मण गावस, स्नेहा देसाई, गुरुप्रसाद नाईक, दिनेश महाले, संदीप परब, शिवनाथ गावस, सत्यवान नाईक, बी.डी. मोटे, सुचिता माईंणकर, सुजय पर्रिकर, कृष्णा गावकर, राजेंद्र नाईक, रघुनाथ गावकर, दीपक गावकर, रितेश सोलयेकर, सिया बोडके, अच्युत गावकर, संचिता नाईक, निलेश परवार, प्रकाश गावस, निळकंठ गावस, अभय सूर्यवंशी, पूर्वी चारी, गुरदास गावस, नीलेश सोलयेकर यांनी खाणीला पाठिंबा व्यक्त केला.
खनिज उत्खननामुळे जलस्त्रोत लुप्त झाले आहेत. खाणी बंद झाल्यानंतर त्याचे प्रतिकूल परिणाम जाणवू लागले. खाणीशी संबंधित भागांत शेती बागायतीवर उत्खननाचे दुष्परिणाम निर्माण होणार आहेत. त्यावर कशी उपायाचा आराखडा सादर करा.वैभव मराठे, सामाजिक कार्यकर्ते
सदर खाणीची खनिज वाहतूक सुरला मार्गे होणार आहे. कायदेशीर तत्त्वांचा अंमल करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाला या संदर्भाचे सूचना करण्यात आल्या होत्या.मात्र या सूचनांची अजिबात दखल घेण्यात आलेली नाही, असे निष्काळजीपणे वागून जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न अशा जन सुनावणीतून होत असेल तर याला काय अर्थ आहे.प्रमोद नागवेकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.