गोवा

Solar Ferry Boat: अवघ्या 20 मिनिटांत चोडणहून पोहोचणार राजधानीत; सोलर पॉवर फेरीबोट सेवा सुरु

Solar Ferry Boat: आजपासून चार फेऱ्या : चोडण-पणजी मार्गावर सोलर पॉवर फेरीबोट सेवा : 60 आसन क्षमता

दैनिक गोमन्तक

Solar Ferry Boat: नदी परिवहन खात्यातर्फे चोडण ते पणजी या मार्गावर उद्या, सोमवारपासून प्रायोगिक तत्त्वावर सोलर पॉवर फेरीबोट सेवा सुरू करण्यात येणार आहे. दररोज सकाळी चोडण बेटावरून दोन फेऱ्या आणि पणजी येथून दोन फेऱ्या मारण्यात येणार आहेत.

नदी परिवहन खात्याचे वरिष्ठ अधिकारी विक्रमसिंग भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेआठ वाजता ही फेरीबोट चोडण फेरी धक्क्यावरून सुटेल आणि ती वीस मिनिटांत पणजी येथील कॅसिनो धक्क्यावर पोहोचेल.

दुसरी फेरीबोट सकाळी साडेनऊ वाजता माडेल-चोडण धक्क्यावरून सुटेल. पणजी येथील कॅसिनोकडे असलेल्या धक्क्यावरून संध्याकाळी साडेचार वाजता आणि नंतर साडेपाच वाजता अशा दोन फेऱ्या मारल्या गेल्या जातील.

पहिल्या 15 दिवसांत चार फेऱ्या मारल्या जातील. 60 प्रवाशांची आसन क्षमता असलेली ही सोलर पॉवर फेरीबोट पणजी ते चोडण हे अंतर 20 मिनिटांत पूर्ण करते, असे त्यांनी सांगितले. 15 दिवसांनी आढावा घेतल्यानंतर या सेवेत बदल केला जाईल, असेही भोसले म्हणाले.

चोडण-रायबंदरसाठी रो-रो सेवा

चोडण-रायबंदर जलमार्गावर मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक लक्षात घेऊन सरकारने येथे रो-रो फेरीबोटी सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे.

काही महिन्यांपूर्वी नदी परिवहन खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, खात्याचे वरिष्ठ अधिकारी विक्रमसिंग भोसले, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट व इतरांनी रो-रो फेरीबोट सेवा सुरू करण्यासाठी कोचीन-केरळ येथे जाऊन फेरीबोट बांधणीच्या कामाची पाहणी केली होती.

या पाहणीनंतर याच पद्धतीच्या फेरीबोटी या मार्गावर सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे भोसले यांनी सांगितले.

विद्यार्थी, पर्यटकांना संधी

या फेरीबोटीमुळे चोडण बेटावरील खास करून ज्यांच्याकडे स्वतःची वाहने नाही, तसेच विद्यार्थी व पणजीकडे बाजारासाठी जाणाऱ्यांना चांगली संधी उपलब्ध होईल.

तसेच पर्यटकांना चोडण बेटावरील पक्षी अभयारण्य पाहण्यासाठी थेट संधी मिळणार आहे, असे विक्रमसिंग भोसले यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT