Goa Tourism: दोन वर्षांनंतर पर्यटन हंगाम फुलला!

Goa: पर्यटकांची गर्दी -उद्योगाशी निगडित घटकांना मोठा दिलासा
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak

Goa Tourism: कोरोना महामारीच्या काळात खोळंबलेला पर्यटन हंगाम पुन्हा एकदा जोमात सुरू झाला असून पर्यटन उद्योगाशी निगडित विविध घटकांना दिलासा मिळाला आहे. नवीन वर्ष, नाताळ आणि विकेंडला पर्यटकांची गर्दी बघायला मिळत आहे.

त्यात आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू झाल्यानंतर विदेशी पर्यटकांना घेऊन चार्टर विमानांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अखेर पर्यटन उद्योगाची गाडी परत रुळावर येत आहे.

यंदा पूर्वीप्रमाणे नवीन वर्षासाठी देशी - विदेशी पर्यटन मोठ्या संख्येत उपस्थित होते. राज्यातील लहान आणि मोठे हॉटेल्स फूल झाले होते.

क्सी आणि भाडेपट्टी दिल्या जाणाऱ्या रेंट - ए - बाईक व रेंट - ए - कार व्यावसायिकांना देखील याचा लाभ झाला आहे. ईडीएम फेस्टिव्हल पुन्हा आयोजित झाल्याने किनारपट्टी भागातील शॅक आणि रेस्टॉरंटना याचा लाभ झाला आहे.

पर्यटन उद्योगाची गाडी रुळावर आणण्यासाठी पर्यटन खाते प्रयत्नशील आहे. यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. हल्लीच पर्यटन उद्योगातील बेकायदेशीर व्यवहारांवर आळा घालण्यासाठी खात्याने आदेश काढला आहे.

त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झाली आहे. त्याशिवाय राज्यात दर्जेदार पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवीन उपक्रम सुरू केले जात आहेत.

Goa Tourism
Goa Health Crisis: 2022मध्ये चिकुनगुनियाच्या रुग्णांत लक्षणीय वाढ

कोरोना महामारीच्या काळानंतर अखेर आतापर्यंत पर्यटन हंगाम उत्तम गेला आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये पर्यटकांनी गर्दी केली होती.

याचा शॅक व्यावसायिकांना याचा थेट लाभ झाला आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्यात दोन्ही ठिकाणी पर्यटक येत आहेत. याचा आनंद होत आहे, कारण कोरोना काळ सगळ्यासाठीच कठीण काळ होता. - क्रूझ कार्दोज, अध्यक्ष, अखिल गोवा शॅल मालक संघटना.

उद्योग आणि अर्थव्यवस्थेसाठी ही चांगली गोष्ट आहे. चार्टर विमान सेवा पूर्ववत झाली आहे. कोरोना महामारीच्या काळात मोठ्या हॉटेल्सना व्यवसाय मिळत होता, परंतु आता लहान हॉटेल्सना सुद्धा चांगला व्यवसाय मिळत आहे.

चार्टर विमान सुरू झाल्याने विदेशी पर्यटक पुन्हा एकदा येण्यास सुरवात झाली आहे. तसेच ई- विझा सुविधा यूकेतून येणाऱ्या सुरू झाली असून पुढील हंगामात याचा फायदा होणार आहे. - नीलेश शहा, अध्यक्ष, टीटीएजी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com