New parliament building in New Delhi Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील माती दिल्लीला जाणार

संचालक सगुण वेळीप; नव्या संसद भवनासाठी पाठवणार

दैनिक गोमन्तक

पणजी: नवी दिल्ली येथील नवीन संसद भवनासाठी गोव्यातील माती पाठवणार असून यासाठी विविध भागातून गोळा केलेल्या मातीचा भूमिपूजन सोहळा 29 जुलै रोजी सायंकाळी 4.00 वाजता इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा, सभागृहात आयोजित केला आहे. (Soil of Goa will be sent for the new parliament building in New Delhi)

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित राहाणार आहेत, अशी माहिती कला व संस्कृती संचालनालयाचे संचालक सगुण वेळीप यांनी दिली. संस्कृती भवन पाटो येथे आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलत होते. अशोक परब व सिद्धार्थ गायतोंडे उपस्थित होते.

यावेळी बोलताना वेळीप म्हणाले की, आझादी का अमृत महोत्सव, आत्मनिर्भर भारत, एक भारत श्रेष्ठ भारतच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उत्सव कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, गोव्यातील माती नवी दिल्ली येथील सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पासाठी नवीन संसद भवनासाठी पाठवण्यात येणार आहे. सोहळ्यासाठी मंत्री, आमदारही उपस्थित राहाणार आहेत.

नागरिकांना केले आवाहन

नागरिकांनी आपल्या गावातील महत्वाच्या ठिकाणाची माती घेऊन मोठ्या संख्येने या समारंभास उपस्थित राहावे. कारण जमवलेली माती देशातील कारभार ज्या इमारतीतून चालवला जाणार आहे. त्या संसद भवनासाठी ही माती जमा केली जाणार आहे. या मातीचे पूजन होईल, त्यानंतर ती नवीन संसद भवनासाठी नवी दिल्लीला पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती वेळीप यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT