Migrant Construction Workers In Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील बांधकाम क्षेत्रातील रोजंदारीवरील मजुरांना सरकारी योजनांचा लाभ? सरकार घेणार तंत्रज्ञानाची मदत

गोव्यातील स्थलांतरित बांधकाम कामगारांना समाज कल्याणकारी योजना आणि आरोग्यसेवा मिळाव्यात यासाठी कामगार आयुक्तांनी नुकतीच एक कार्यशाळा आयोजित केली.

Pramod Yadav

Migrant Construction Workers In Goa: कामाच्या शोधात विविध राज्यात परराज्यातील कामगार येत असतात, त्यात प्रामुख्याने बांधकाम कामगारांचा अधिक समावेश असतो. गोव्यातील स्थलांतरित बांधकाम कामगारांना समाज कल्याणकारी योजना आणि आरोग्यसेवा मिळाव्यात यासाठी कामगार आयुक्तांनी नुकतीच एक कार्यशाळा आयोजित केली.

स्थलांतरित कामगारांना दिल्या जाणाऱ्या सेवांची परिणामकारकता मजबूत करणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता.

'कार्यशाळा नीती आयोग आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने (Niti Aayog And WHO) घेण्यात आली होती. स्थलांतरित कामगारांना भेडसावणाऱ्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक कौशल्ये आणि माहिती देणे हा या कार्यशाळेचे उद्देश होता.' असे कामगार आयुक्त एग्नेलो फर्नांडिस यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

कार्यशाळेत सरकारी अधिकार्‍यांना असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या राष्ट्रीय डेटाबेसचे महत्त्व, कोविड-19 महामारी आणि स्थलांतरित कामगारांच्या समस्यांची माहिती देण्यात आली.

विविध महत्त्वाच्या सरकारी विभागांतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी कार्यशाळेला हजेरी लावली, कार्यशाळेत माहितीची देवाणघेवाण, सहकार्य, नवीन धोरण निर्मिती आणि नियोजन धोरण यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.

कार्यशाळेत सेवा वितरण सुलभ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल साधनांचा अवलंब करून प्रक्रिया सुलभ करण्यावर भर देण्यात आला. 'तंत्रज्ञानाच्या झपाट्याने झालेल्या प्रगतीमुळे, स्थलांतरित कामगारांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारी विभागांनी डिजिटल सोल्यूशन्सचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.' असे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकसंख्या अभ्यास आणि स्थलांतर या विषयाचे संशोधक अभ्यासक नंदकुमार सावंत यांनी या कार्यशाळेचे नेतृत्व केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

SCROLL FOR NEXT