Tara Kerkar Demands Read Light Area in Goa: Dainik Gomantak
गोवा

Goa Red Light Area: गोव्यात रेड लाईट एरियाची गरज; तारा केरकर यांची मागणी

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनाही दिला होता इशारा

Akshay Nirmale

Tara Kerkar Demands Read Light Area in Goa: राज्यातील लैंगिक गुन्ह्यांची संख्या कमी करण्यासाठी गोव्याला ‘बाजार’ (रेड लाईट एरिया) आवश्यक असल्याचे मत, सामाजिक कार्यकर्त्या तारा केरकर यांनी व्यक्त केले आहे.

दक्षिण गोव्यातील एका शाळेतील कथित विनयभंगाच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना केरकर यांनी ही मागणी केली.

त्या म्हणाल्या की, राज्यासाठी रेड लाईट एरिया आवश्यक आहे. ज्यांना स्वतःला संतुष्ट करायचे आहे ते आमच्या मुलींवर हल्ला करण्यापेक्षा तिथे जाऊन स्वतःचे समाधान करू शकतात. गोव्यात आज सर्वकाही आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे.

पण येथे रेड लाईट एरिया नाही. तो नसल्या कारणानेच ही असली डोकी फिरलेली लोकं, नालायक लोकं लहान मुलींचे लैंगिक शोषण करतात. मुलींचे आयुष्य उद्धवस्त करतात. गोव्यात बायना येथे रेड लाईट एरिया होता. पण तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तो बंद केला.

मी तेव्हाच मनोहर पर्रीकर यांना इशारा दिला होता की, तुम्ही हा बाजार उद्धवस्त करत आहात. पण असे पाऊल उचलणे हे भविष्यात त्रासदायक ठरू शकेल. गोव्यात पुढे जाऊन वातावरण तंग होईल, त्याला जबाबदार तुम्ही असाल.

बडे श्रीमंत लोक हॉटेल्समध्ये हे सर्व करत असतातच. रेड लाईट एरिया नसला तरी हे सर्व चालतच असते. पण इतरांसाठी ते सहज सर्वांसाठी उपलब्ध नाही. गावाबाहेर का असेना पण करा. कारण अनेक मुलींचे आयुष्य उद्धवस्त होत आहे, असे त्या म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT