Bhausaheb Bandodkar Dainik Gomantak
गोवा

Goa: ...म्हणून बांदोडकरांना गोवा करायचा होता महाराष्ट्रात विलीन

Goa: कूळ-मुंडकार प्रश्न: न्यायासाठी संघटित होण्याचे खलप यांचे आवाहन

दैनिक गोमन्तक

Goa: गोवा मुक्तीनंतर गोवा महाराष्ट्रात विलीन करावा, यामागे महाराष्ट्रातील जमिनीबाबतचे सगळे कायदे लागू होऊन गोव्यातील कूळ - मुंडकारांना त्याचा लाभ होईल यासाठीच गोवा महाराष्ट्रात विलीन व्हावा, अशी गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांची इच्छा होती, असे प्रतिपादन माजी कायदामंत्री ॲड. रमाकांत खलप यांनी केले.

पेडणे येथे पेडणे तालुका नागरिक समितीतर्फे कूळ - मुंडकारांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर ॲड. प्रभाकर नारूलकर, समितीचे अध्यक्ष पुंडलिक धारगळकर, व्यंकटेश नाईक, डॉम्निक फर्नांडिस, जामन मांद्रेकर उपस्थित होते.

ॲड. खलप पुढे म्हणाले, की 1963 मध्ये हा कायदा भाऊसाहेब बांदोडकरांनी विधानसभेत केला. नंतर मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांनी कूळ - मुंडकारांना न्याय मिळावा यासाठी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करून कायदा सुटसुटीत करण्याची मागणी केली व ती मान्यही झाली.

मात्र, त्यानंतर त्याची योग्य प्रकारे कार्यवाही झालीच नाही. व्यंकटेश नाईक यांचेही यावेळी मार्गदर्शनपर भाषण झाले. शिवकुमार आरोलकर यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. जामन मांद्रेकर यांनी आभार मानले.

म.गो.नंतरची सरकारे गंभीर नाहीत

तत्कालीन मगोपचे सरकार गेल्यानंतर त्यानंतरच्या सरकारांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलेच नाही. या चळवळीतील नेते नंतर मंत्री वगैरे झाले; पण चळवळ थंडावली. त्यामुळे कूळ - मुंडकारांचे खटले प्रलंबित राहिले असून दोन - तीन पिढ्यांपर्यंत निकाल लागत नाहीत, अशी खंत ॲड. खलप यांनी व्यक्त केली. भरपूर मेहनत घेऊन कूळ-मुंडकारांच्या समस्या व उपाययोजनांचे पुस्तक सरकारला सादर केले, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही, असेही ते म्हणाले.

संघटितपणे लढा देण्याची गरज

प्रभाकर नारूलकर म्हणाले की, ॲड. रमाकांत खलप कायदामंत्री असताना त्यांनी सरकारला अहवाल सादर केला होता. मात्र, त्याची सरकारने योग्यप्रकारे दखल घेतली नाही. त्यांनी केलेले कायदे बासनात गुंडाळण्यात आले. त्यामुळे कूळ - मुंडकारांना अद्याप न्याय मिळत नाही. आज कूळ-मुंडकारांना कुणीही वाली नाही. त्यासाठी जनजागृती, संघटित होऊन लढा देणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक सल्ला देण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Points Table: इंग्लंडला डबल झटका! आधी कांगारुंनी मैदानात दिली मात, नंतर WTC पॉइंट टेबलमध्ये झाली घसरण; जाणून घ्या भारताची सध्याची स्थिती

गोव्यात जमीनमालकांना झटका! मुंडकारांना हक्क मिळेपर्यंत जमिनीची विक्री होणार नाही; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

Shani Gochar: 2026 नव्हे 2027 मध्ये होणार शनिदेवाचे राशी परिवर्तन, 'या' 5 राशींना राहावं लागणार सावधान; आरोग्य, धन आणि संबंधांवर थेट परिणाम!

Baba Vanga Predictions: 2026 मध्ये 'या' 5 राशीचे लोक होणार मालामाल, बाबा वेंगांची 'अफाट धनलाभा'ची भविष्यवाणी; शनिदेवाची राहणार कृपा!

IFFIESTA: संगीतप्रेमींनो, IFFI घेऊन आलंय 3 धमाकेदार कॉन्सर्ट्स पूर्णपणे मोफत; कधी आणि कुठे? सविस्तर माहिती येथे!

SCROLL FOR NEXT