Sneha Sawal Dainik Gomantak
गोवा

Navratri 2022 : कर्तव्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस अधिकारी स्नेहा सावळ

गुन्ह्यांच्या पलीकडे जात महिलांच्या भावना समजून घेणाऱ्या एक सक्षम अधिकारी म्हणून स्नेहा यांची ओळख आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Navratri 2022 : कर्तव्याप्रती नेहमी सजग राहून समाजाचे ऋण फेडता येतात, अशी भावना हणजूण पोलिस स्थानकात महिला उपनिरीक्षक पदावर असलेल्या स्नेहा शंकर सावळ यांची आहे. काैटुंबिक कलहामुळे किंवा इतर कारणांमुळे महिलांवर अत्याचार होतात. काही महिला गुन्ह्यांत अडकतात. गुन्ह्यांच्या पलीकडे जात महिलांच्या भावना समजून घेणाऱ्या एक सक्षम अधिकारी म्हणून स्नेहा यांची ओळख आहे.

हणजूण, वागातोर हा किनारी भाग असल्याने 24 तास अलर्ट राहावे लागते. ड्रग्स, वेश्याव्यवसाय, चोऱ्या तसेच अन्य प्रकारचे प्रकार गैरधंदे सतत सुरू असतात. अनेकवेळा पुरुषांच्या बरोबरीनेच महिलाही आरोपी म्हणून आढळतात. अशावेळी एक महिला या नात्याने आरोपी महिलेशी संवाद साधताना अनेक गोष्टी पुढे येतात. विशेष करून महिलांना अशावेळी कायद्याचा धाक दाखविण्याऐवजी आपुलकीची तसेच सहानुभूतीचीही मदत लागते. बऱ्याचदा त्यांचे भावविश्व जाणून घेत गुह्यांचा उलगडाही लावला आहे, असेही स्नेहा सागतात.

स्नेहा सावळ या पेडणे तालुक्यातील किरणपाणी गावच्या. लहानपणापासूनच समाजातील विषमता तसेच महिलांवरील अत्याचारांना पाहात आलेल्या आणि त्या जाणून घेत असल्याने स्नेहा यांना आपण काहीतरी वेगळे करण्याची जिद्द होती. पदवी मिळविल्यानंतर त्या 2016 मध्ये राज्य पोलिस दलात रुजू झाल्या. सध्या त्या बार्देश तालुक्यातील हणजूण पोलिस स्थानकात उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. महिलांचे होत असलेले शोषण, त्यांच्यावर होणारे अत्याचार पाहून स्नेहा यांच्या पायाची आग मस्तकाला भिडते. पैशांच्या तसेच बळाच्या जोरावर इतरांचे सामाजिक हक्क हिसकावून घेण्याचा हक्क दिलाच कुणी? असा संताप त्या व्यक्त करतात.

महिलांसाठी ‘आधार’च

पोलिस अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर स्नेहा सावळा यांनी समाजातील भेदाभेद आणि महिलांचे होणारे शोषण यासाठी कसोशीने प्रयत्न चालविले आहेत. आपण कितीही आधुनिकतेच्या गोष्टी करीत असलो तरी समाज कधी कधी आजही सोळाव्या शतकातच असल्यासारखा वागतो, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. यासाठी केवळ पोलिस खातेच सगळं काही बदलू शकणार नाही. त्यासाठी सर्वांचा हातभार गरजेचे आहे, असे त्या सांगतात.

हणजूण पोलिस स्थानकात कार्यरत असलेल्या उपनिरीक्षक स्नेहा सावळ या एकमेव महिला पोलिस अधिकारी आहेत. तरीही, कामासंदर्भात ही कमतरता त्यांनी कधीच भासू दिली नाही. कारण, उपनिरीक्षक सावळ या एक सक्षम अधिकारी आहेत. त्या नेहमीच निष्ठेने व समर्पित भावनेने काम करतात. हणजूण पोलिस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील सर्व महिलांविषयी प्रकरणे त्याच हाताळतात. त्याचप्रमाणे संवेदनशील प्रकरणे त्या खूपच समजूतदारपणे हाताळतात. ही त्यांच्या कामाची खुबीच. या कामाव्यतिरिक्त इतर दैनंदिन कामांमध्ये त्यांचे आम्हाला नेहमीच सहकार्य लाभते, अशा शब्दात हणजूण पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई यांनी कौतुक केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT