Frogs Dainik Gomantak
गोवा

Jumping Chicken: कारवारमधून गोव्यात 'जंपिंग चिकन'ची तस्करी, 42 बेडकांना जीवदान

Jumping Chicken: वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी बस चालकाला अटक केली असून, तस्करी करणारा संशयित घटनास्थळावरुन फरार झाला.

Pramod Yadav

Jumping Chicken

पावसाळ्यात गोव्यात जंपिंग चिकन म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेडकांची शिकार तसेच, तस्करीच्या घटना उघडकीस येत असतात. असेच कारवारमधून गोव्यात येणाऱ्या 42 बेडकांच्या तस्करीचे प्रकरण उघडकीस आले आहे. कारवार वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी कारवाई करत एका खासगी बस चालकाला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, कारवार -गोवा मार्गाने एका खासगी बसमधून 42 बे़डकांची गोव्यात तस्करी केली जात होती. गोव्यात बड्या हॉटेलमध्ये जंपिंग चिकन म्हणून हे प्रसिद्ध आहे. यासाठी बेडकांची तस्करी केली जात असल्याचे कारवार वन विभागाला माहिती मिळाली होती.

अधिकाऱ्यांनी कोडीबाग येथे सापळा रचून संशयित खासगी बसची तपासणी केली असता त्यात 42 बेडूक आढळून आले. अधिकाऱ्यांनी बस चालकाला अटक केली असून, तस्करी करणारा संशयित घटनास्थळावरुन फरार झाला. अधिकाऱ्यांनी 42 बेडकांना जीवदान दिले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बेडकांची करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. वेळ्ळी येथील फर्नांडीस आणि परेरा या दोघांना वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती.

बेडकांची गणती संरक्षित प्रजातीत होत असून त्यांची शिकार करण्यास कायद्याने बंदी आहे. शिवाय बेडूक जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक असून बेडकांच्या माध्यमातून निसर्गातील अन्न साखळी समतोल राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT