Smart Phone Dainik Gomantak
गोवा

Colvale Jail: कोलवाळ कारागृहात कैद्यांसाठी स्मार्ट फोन पे-सिस्टीम सुविधा

Colvale Jail Smart Phone Pay System: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील वाढत्या मोबाईल फोन तस्करीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील वाढत्या मोबाईल फोन तस्करीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून स्वातंत्र्यदिनी, नवीन स्मार्ट फोन पे-सिस्टीम सुरू केली आहे.

गुरुवारी, ७८व्या स्वातंत्र्यदिनी ही प्रणाली अमलात आणली गेली. कारागृहाचे महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई यांनी या प्रणालीचे उद्घाटन केले. ज्यामध्ये कैद्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी तसेच वकीलांशी संपर्क साधण्यासाठी सात स्मार्ट कार्ड फोनचा समावेश केला आहे. सुरक्षतेखातीर, या फोनद्वारे केलेले सर्व व्हॉईस कॉल रेकॉर्ड केले जातील. एकूण सात स्मार्ट कार्ड फोन याठिकाणी बसविले आहेत.

कारागृहात सेलफोनची तस्करी रोखली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलले आहे. या उपक्रमाव्यतिरिक्त, तुरुंगाने सततच्या पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी नवीन बोअरवेलचे अनावरण तसेच या ठिकाणच्या कॅन्टीनचे अपग्रेडेशन केले आहे.

दरम्यान, कोलवाळ कारागृहात तुरुंग प्रशासनाकडून वेळोवेळी छापा टाकला जातो. यावेळी अनेकदा कैद्यांकडे मोबाईल फोन सापडायचे. त्यामुळे कारागृहातील ही वाढती मोबाईल संचची तस्करी रोखण्यासाठी तुरुंग प्रशासनाकडून ही नवीन स्मार्ट फोनची प्रणाली आणली गेली आहे. त्यानुसार, प्रत्येक ब्लॉकमध्ये ही स्मार्ट फोन यंत्रणा बसवण्यात आली आहे.

‘से नो टू ड्रग्ज’वर पथनाट्य

स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘से नो टू ड्रग्ज’ या विषयावर कला अकादमीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले पथनाट्य तसेच कैद्यांनी गायलेल्या देशभक्तिपर गीतांसह सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. या शिवाय, सुधारित कैद्यांच्या कथा दाखविणारा लघुपट कैद्यांसाठी दाखवण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ICC T20 क्रमवारीत मोठा फेरबदल! अभिषेक शर्मा नंबर 1 वर कायम तर सूर्या-तिलक वर्मा यांची घसरण

Goa Drug Bust: थिवी रेल्वे स्थानकावर 3.5 लाखांचा अंमली पदार्थ जप्त, 25 वर्षीय नेपाळी नागरिकाला अटक; कोलवाळ पोलिसांची कारवाई

...त्यांनी मला रडवलं, ओझं घेऊन भर पावसात 5KM चालले; दक्षिण गोव्यात टॅक्सी माफियांची गुंडागर्दी, गुजराती महिलेने सांगितला धक्कादायक अनुभव Video

Akasa Air चा सावळा गोंधळ, पुण्यात सुरक्षा तपासणी विलंबामुळे सहाजण गोव्यातील शूटिंग चॅम्पियनशिपला मुकले

Goa Live Updates: मुंगुल हल्ल्याप्रकरणी एका आरोपीला सशर्त जामीन मंजूर!

SCROLL FOR NEXT