Goa infrastructure Dainik Gomantak
गोवा

Smart City Panjim: पणजी शहर बनतंय 'स्मार्ट'!! विकासाला वेग; 849 कोटी खर्चून 42 प्रकल्प पूर्ण

Panjim Development News: केंद्र सरकारकडून पणजी स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी १०५१ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत, ज्यामध्ये ५१ प्रकल्पांचा समावेश आहे

Akshata Chhatre

पणजी: केंद्र सरकार कडून राबल्या जाणाऱ्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत १०० शहरांची निवड करण्यात आलीये, या शहरांमध्ये गोव्यातील पणजी शहराचा देखील समावेश आहे. या योजनेच्या अंतर्गत शहरांमधील हवामानात सुधारणा करवून आणणं तसेच शहरातील पायाभूत सुविधांचा विकास याचा समावेश असतो. केंद्र सरकारकडून पणजी स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी १०५१ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत, ज्यामध्ये ५१ प्रकल्पांचा समावेश आहे.

स्मार्ट सिटीला मुदतवाढ!

पणजीत स्मार्ट सिटी प्रकल्पाला केंद्र सरकारकडून ३१ मार्च २०२५ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आलीये. यामध्ये ८४९ कोटी रुपयांचे ४२ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तर २०२ कोटींच्या ९ प्रकल्पांचे काम अद्याप सुरु आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या ४४१ कोटी रुपयांपैकी ४११ कोटी रुपये खर्च करण्यात आलेत.

'CITIIS 2.0' या योजनेअंतर्गत पणजी शहराला 94 कोटी

पणजी शहराच्या शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्र सरकारने 'CITIIS 2.0' या योजनेअंतर्गत पणजी शहरासाठी तब्बल ९४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

या निधीच्या माध्यमातून पणजी शहरात कचरा व्यवस्थापन आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी विशेष उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. राजस्थानमधील जयपूर येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात या निधीची घोषणा करण्यात आली.

'CITIIS 2.0' या योजनेअंतर्गत पणजी शहराची दोन विभागांत निवड झाली आहे. पहिल्या विभागात कचरा व्यवस्थापनासाठी ८९ कोटी रुपये आणि दुसऱ्या विभागात हवामान बदलाच्या उपाययोजनांसाठी ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीच्या साहाय्याने पणजी शहरात कचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. तसेच, हवामानातील बदलांमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी विशेष उपाययोजना राबवल्या जाणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT