Smart City Dainik Gomantak
गोवा

Smart City : राजधानी ‘स्मार्ट सिटी’ वाऱ्यावर; अनेक कामे प्रलंबित

Smart City : उच्च न्यायालयाने ३१ मेपूर्वी स्मार्ट सिटीची सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु सद्य:स्थिती पाहता पणजी ‘स्मार्ट’ होण्यासाठी यंदाचा पावसाळा जावा लागेल अशीच स्थिती आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

गंगाराम आवणे

Smart City :

पणजी, राजधानी पणजीत ‘स्मार्ट सिटी’च्या कामांमुळे सर्वत्र अस्ताव्यस्तपणा आला आहे. शहरात कुठेही फिरा, काही ना काही काम सुरू आहे.

उच्च न्यायालयाने ३१ मेपूर्वी स्मार्ट सिटीची सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु सद्य:स्थिती पाहता पणजी ‘स्मार्ट’ होण्यासाठी यंदाचा पावसाळा जावा लागेल अशीच स्थिती आहे.

जेवढ्या जलतगतीने ही कामे व्हायला हवीत तेवढ्या वेगाने ती होत नाही आहेत. स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करताना अनेक समस्या उद्‌भवत आहेत. रस्‍ते खोदून ठेवलेले आहेत. सांडपाणी तसेच इतर कामे प्रलंबित आहेत.

स्मार्ट सिटीची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण होणार की पुढील वर्षी हे स्पष्ट करणे गरजेचे आहे. तारखा सांगून लोकांच्‍या डोळ्यांत धूळफेक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या कामांमुळे पणजीकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतेय.

- उत्पल पर्रीकर

पणजीतील कामे ३१ मेपर्यंत पूर्ण होणे आता शक्य नाही. अतिशय संथगतीने ही कामे सुरू आहेत. शिवाय कामगारही कोठे दिसत नाहीत. ही सगळी परिस्‍थिती लक्षात घेता पुढील केवळ २० दिवसांत कामे पूर्ण होणे अशक्यच आहे. पणजीकरांनी संयम राखावा.

- उदय मडकईकर,

माजी महापौर/विद्यमान नगरसेवक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Codar IIT Project: 'गावात आयआयटी नकोच'! गावडेंचा कोडारवासीयांना पाठिंबा; विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत नेणार असल्याची दिली माहिती

Human Animal Conflict: नेमकं हद्दीत घुसलंय कोण? माणूस की हत्ती?

Anganwadi: 'अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्‍युइटी, पीएफ, पेन्‍शनसह टॅबही द्यावा'! श्रीपाद नाईकांना निवेदन सादर

GCA: जीसीएच्या कर्मचाऱ्यांचा बोलका जल्लोष; क्रिकेट क्लबांनी शिकवलेले शहाणपण

Mhadei River: ‘म्हादई’ केवळ पाण्याचा स्रोत नव्हे, सांस्कृतिक वारसा! नदीच्या पैलूंचे सखोल दर्शन घडवणारे पुस्तक प्रकाशित

SCROLL FOR NEXT