Small business Summit Dainik Gomantak
गोवा

Goa : गोव्यातील लघुउद्योग अधिवेशनात तब्बल 500 उद्याेजकांचा सहभाग

शुक्रवारी आयोजन; राज्‍यात लघुद्योगांची वाढ करणे हेच प्रमुख ध्‍येय

गोमन्तक डिजिटल टीम

देशात कृषी उद्योगानंतर सर्वात जास्त रोजगारनिर्मिती करणारा उद्योग म्‍हणून सूक्ष्म लघु-मध्यम उद्योगाकडे (एमएसएमई) पाहिले जाते. अर्थव्यवस्थेत उत्पादनात 40 टक्के आणि निर्यातीत 60 टक्के योगदान लघुद्योगाद्वारे मिळते. ‘लघुद्योग भारती’ ही देशात पसरलेली संस्था आहे. लघुद्योगांची वाढ होण्याच्या उद्देशाने गोव्यात शुक्रवार दि. 6 रोजी लघुद्योग अधिवेशन होत आहे. त्‍यात 500 हून अधिक उद्योजक सहभागी होण्याची शक्यता आहे, असे लघुद्योग भारतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रवींद्र सोनावणे म्‍हणाले.

पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सोनावणे बोलत होते. यावेळी लघुद्योग भारती गोवा विभागाचे अध्यक्ष राजकुमार कामत, उपाध्यक्ष मनोज पाटील, पंजाब नॅशनल बँकचे साहाय्यक महाव्यवस्थापक राकेश कुमार, अर्मान बंकले, मुदीत अगरवाल आणि मंदार म्हापसेकर उपस्थित होते.

गोव्यातील लघुद्योजक केंद्राच्‍या योजनांचा फारसा लाभ घेत नाहीत. यासंदर्भात जागृती करण्यात येणार आहे. कारण लघुद्योग वाढविण्‍याचे लक्ष्य आहे. यासाठी 6 जानेवारी रोजी दोनापावल येथील राजभवन परिसरातील दरबार हॉलमध्ये गोवा लघुद्योग अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती राजकुमार कामत यांनी दिली.

तज्‍ज्ञांचे लाभणार मार्गदर्शन

या कार्यक्रमात एमएसएमई धोरण, व्यवसाय प्रसिद्धी साधन, अपारंपरिक वित्तीय स्रोतांची ओळख, निर्यात का आणि कशी, एमएसएमईच्या वाढीसाठी कृती आराखडा आणि एमएसएमईसाठी व्यवसायाच्या संधी आदी विषयांवर केंद्रीय मंत्री आणि औद्योगिक तज्‍ज्ञांची सत्रे होणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि गोव्याचे उद्योगमंत्री माविन गुदिन्हो कार्यक्रमाला उपस्थित असतील, असे कामत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT