Goa Tourist : मिरामार बीचवर राजस्थानच्या फॉर्च्युनर कारचालकाची हुल्लडबाजी

राजस्थानमधून गोव्यात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी आपली कार मिरामारवर बीच नेल्याने पोलिसांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.
Goa Tourist
Goa TouristDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात गेल्या काही दिवसात बेशिस्त पर्यटकांची हुल्लडबाजी सुरुच असल्याचं दिसून येत आहे. पर्यटक मौजमस्तीसाठी गोव्यात येतात आणि आपल्या कार बीचवर फिरवत आपल्यासह इतरांचाही जीव धोक्यात घालतात. असाच एक प्रकार पणजीतील मिरामार बीचवर दिसून आला आहे. राजस्थानमधून गोव्यात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी आपली कार मिरामारवर बीच नेल्याने पोलिसांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.

राजस्थान पासिंगची टोयोटा फॉर्च्युनर कार काल सोमवारी मिरामार बीचवर फिरवत असताना पोलिसांनी पर्यटकांना पकडलं. असे प्रकार गेल्या काही दिवसांपासून सर्रासपणे गोव्यात सुरु असून पोलिसांनी आता अशा बेशिस्त पर्यटकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पणजी पोलिसांनी राजस्थानमधील या पर्यटकांना 1500 रुपयांचा दंड ठोठावत पुन्हा असं न करण्याची तंबी देत सोडलं.

Goa Tourist
Goa Beach: बोगमाळो किनाऱ्यावर वाळूत अडकली तेलंगणातील आमदाराची कार...

दरम्यान कालच वागातोर बीचवर एक पिकअप धोकादायक पद्धतीने धावत असल्याचा व्हिडीओही समोर आला होता. अनेक पर्यटक याठिकाणी असताना त्यांचा जीव धोक्यात घालून वाहन चालविल्याचे दिसत आहे. वाहन कर्नाटक पासिंगचं असल्याची माहिती समोर आली होती. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांंमुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. अशा घटनांना वेळीच पायबंद घातला पाहिजे असे नागरिकांनी म्हटले होतं.

याआधीही दाबोळी बोगमाळो समुद्र किनाऱ्यावर एका पर्यटकाने आपली कार चक्क किनाऱ्यावर घातली आणि ही कार वाळूत रूतून बसली. याची माहिती स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना दिली. विशेष म्हणजे या कारवर विधानसभा सदस्य म्हणजेच आमदार असल्याचे स्टीकर होते. ही फोर्ड कार तेलंगणातील असून टीएस 08 एफके 9786 असा या कारचा क्रमांक आहे. ही कार तेलंगणा राज्यातील आमदाराची असल्याची माहिती प्राप्त झाली होती. वास्को पोलिसांनी समुद्र किनार्‍यावर चारचाकी वाहन नेल्या प्रकरणी, तेलंगणा आमदाराच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली होती. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com