Goa Assembly Election 2022 Dainik Gomantak
गोवा

बाहेरील पक्षांची 'गोवा भाजपला' धास्ती..!

गोव्‍यात सत्तेवर आल्यास प्रत्येक घरातील प्रमुख महिलेला दरमहा 5 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येईल; TMC

दैनिक गोमन्तक

पणजी: विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) पार्श्वभूमीवर घोषणाबाजींना ऊत आला आहे. राज्य सरकारच्या गृह आधार योजनेच्या धर्तीवर नवी योजना जाहीर केली आहे.  गोव्‍यात (Goa) सत्तेवर आल्यास प्रत्येक घरातील प्रमुख महिलेला दरमहा 5 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येईल, अशी आणखी एक घोषणा तृणमूल काँग्रेस पक्षातर्फे (TMC Goa) आज करण्यात आली. त्यासाठी ‘गृहलक्ष्मी कार्ड’ योजना राबविण्याची ग्वाही या पक्षाकडून देण्यात आली आहे. दरम्यान बाहेरून आलेले पक्ष आमच्या योजनांची ‘कॉपी’ करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी केला आहे. 

विधानसभा निवडणूक (Goa Assembly) तोंडावर आली असून सत्तेवर येण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष वेगवेगळी राजनीती अवलंबत आहे. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करणे, हे त्यांचे प्रमुख ध्येय बनले आहे. यात स्थानिक राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्ष आणि बाहेरील राज्यांतून आलेले पक्षही मागे नाहीत. पश्‍चिम बंगालमध्ये सत्तेवर असलेल्या तृणमूल काँग्रेसने गोव्यातही सत्तेवर येण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त चालवली आहे. दोनापावला येथे शनिवारी झालेल्या एका कार्यक्रमात तृणमूलच्या खासदार तथा गोवा प्रभारी महुआ मोईत्रा यांनी ‘गृहलक्ष्मी कार्ड’ योजनेची घोषणा केली. घरातील प्रमुख कर्त्या महिलेला सबल बनवण्यासाठी आणि महिलांना सक्षम करण्यासाठी ही योजना राज्यात राबवली जाईल. त्यासाठी तृणमूल काँग्रेसला संधी द्या, असे आवाहन मोईत्रा यांनी यावेळी केले. यावेळी व्यासपीठावर पक्षाचे नेते किरण कांदोळकर, यतीश नाईक आणि मान्यवर उपस्थित होते.

आमच्या योजनांची ‘कॉपी’

मुख्यमंत्री डॉ . प्रमोद सावंत आपच्या या योजनेवर प्रतिक्रिया देताना म्हणाले, ते आमच्या योजनांची कॉपी करत आहेत. त्यांना माहीत आहे, त्यांचे सरकार कधीही सत्तेवर येणार नाही म्हणून ते जुन्या योजनांमध्ये केवळ रक्कम वाढवत आहेत.

बाहेरील पक्षांची भाजपला धास्ती

किरण कांदोळकर यांनी सत्ताधारी भाजपवर शरसंधान साधले. आमचाच पक्ष बलाढ्य असून आम्हालाच पुन्हा सत्ता मिळणार, अशा वल्गना करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना बाहेरून आलेल्या पक्षांची का भीती वाटावी, असा प्रश्‍न त्यांनी यावेळी केला. तृणमूलची ‘गृहलक्ष्मी कार्ड’ योजना राज्यातील महिलांना याचा लाभ दिला जाईल, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT