वास्को: बायणातील दरोडा प्रकरणी काल (मंगळवारी) आठव्या दिवशी सहा संशयितांना पोलिसांनी मुंबईतून अटक केली. ते ओडिशातील आहेत, अशी माहिती मुरगाव पोलिसांनी दिली आहे. नायक यांच्या जुन्या कामगाराने हे कृत्य केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.
चोरीचे सोने विकण्यासाठी दरोडेखोरांनी प्रयत्न केला, त्यात त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. संशयितांना आणण्यासाठी खास बस रवाना झाली आहे. बायणातील दरोड्याचा आठ दिवसांमध्ये पोलिसांनी छडा लावल्याबद्दल, ज्यांच्या घरावर दरोडा पडला ते सागर नायक यांनी आनंद व्यक्त केला आहे.
मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनीही पोलिसांचे कौतुक केले आहे. संशयितांना गोव्यात आणल्यानंतर पोलिस अधिकारी अधिकृत पत्रकार परिषदेद्वारे माहिती देतील. तसेच संशयितांकडून आणखी काही प्रकरणांचा उलगडा होऊ शकेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
वर्षभरापूर्वी सोडली होती त्याने नोकरी
मूळचे ओडिशाचे रहिवासी असलेल्या सहाजणांना मुंबई येथे अटक केली आहे. त्यांच्याकडून काही ऐवज जप्त करण्यात आला.
सहा जणांपैकी एक सहकारी हा सागर नायक यांच्या खाद्य दुकानात कामाला होता, अशी माहिती समोर आली आहे.
वर्षभरापूर्वी तो नोकरी सोडून गेला होता. त्याने रेकी करून बायणा येथे दरोड्याचा प्लान केला व तो यशस्वी झाला.
संशयितांना घेऊन पोलिसांचे पथक हे रात्री उशिरा गोव्यात दाखल होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
कामगारांची चौकशी केली; मोबाईल डेटा मिळवला!
नाही, याची खबरदारी दरोडेखोरांनी घेतली होती. इमारतीची खडानखडा माहिती एखाद्या माहितगारालाच असली पाहिजे, असे स्पष्ट झाले होते.
तिजोरीबद्दल नेमकी विचारणा करणे; कारची चावी घेतल्यावर थेट त्याच कारसमोर जाणे; लोखंडी ग्रिल्स नसलेल्या किचनच्या खिडकीसमोर जाणे; या सर्व गोष्टी कोणी माहितगारच करू शकतो, तेव्हाच ते शक्य झाले, यावर एकमत झाले.
नायक यांच्या काही आजी-माजी कामगारांवर तसेच इतर काहीजणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यातूनच पुरावा मिळत गेला. काहींच्या मते पोलिसांनी मोबाईलाचा डम्प डेटा मिळवून त्याद्वारे पुढील तपास हाती घेतला.
दरोडा घातल्यावर चोरटे मुंबईला कसे निसटले, हा प्रश्नच आहे. ते एकत्रितपणे गेले की वेगवेगळे गेले? त्यांनी रेल्वे, बस की आणखी कोणत्या मार्गाचा अवलंब केला? यासंबंधी त्यांना गोव्यात आणल्यावर सर्व गोष्टी स्पष्ट होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.